ओव्हरफ्लो भावली धरणाचे जलपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:14 AM2021-07-30T04:14:54+5:302021-07-30T04:14:54+5:30
धरणांचा तालुका म्हणून ख्याती असलेल्या इगतपुरी तालुक्यात सर्वाधिक पाऊस होऊन धरणे झपाट्याने भरतात. इगतपुरी तालुक्यातील धरणांमुळेच आज राज्यातील अनेक ...
धरणांचा तालुका म्हणून ख्याती असलेल्या इगतपुरी तालुक्यात सर्वाधिक पाऊस होऊन धरणे झपाट्याने भरतात. इगतपुरी तालुक्यातील धरणांमुळेच आज राज्यातील अनेक तालुक्यांना दिलासा मिळतो. इगतपुरी तालुक्यात नैसर्गिक संपदा आहेच त्याबरोबरच जलसंपदा ही भूषणावह बाब असल्याचे प्रतिपादन विधान सभाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी केले. यावेळी विधानसभा प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी भावली धरण परिसरातील पर्यटनाबाबतचा आढावा घेऊन पर्यटनाच्या उर्वरित कामाला गती देण्याच्या सूचना दिल्या.
जलपूजन सोहळ्याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके, जनार्दन माळी, बाळासाहेब गाढवे, संदीप गुळवे, इगतपुरीचे नगराध्यक्ष संजय इंदुलकर, उपनगराध्यक्ष नईम खान, महिला आघाडी अध्यक्षा श्रीमती अनिता घारे, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन ज्ञानेश्वर लहाने, पांडुरंग शिंदे, रमेश पाटेकर, नारायण वळकंडे, पोपटराव भागडे, तालुकाध्यक्ष रामदास धांडे, हरीश चव्हाण, अरुण गायकर, बाळासाहेब वालझाडे यांच्यासह जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अलका अहिरराव, कार्यकारी अभियंता सागर शिंदे, तहसीलदार परमेश्वर कासुळे, बीडीओ लता गायकवाड आदी उपस्थित होते.
फोटो- २९ भावली जलपूजन
भावली धरणाचे जलपूजन करताना विधानसभेचे प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार हिरामण खोसकर, शिवराम झाेले आदी.
290721\29nsk_23_29072021_13.jpg
फोटो- २९ भावली जलपूजनभावली धरणाचे जलपूजन करताना विधानसभेचे प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार हिरामण खोसकर, शिवराम झाेले आदी.