११ बीआरडीत ओव्हरॉल्ड पहिल्या सुखोईचे वायुसेनेच्या ऑपरेशन स्क्वॉडनला हस्तांतरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 05:46 PM2018-10-26T17:46:26+5:302018-10-26T17:52:52+5:30

भारतीय वायुसेनेनेच्या लढाऊ विमानांच्या दुरुस्ती व देखभालविभागाने संपूर्णपणे स्वदेशी यंत्रणा वापरून ओव्हरॉल्ड केलेल्या पहिल्या सुखोई ३० एमके आय एयर मार्शल हेमंत शर्मा यांनी दक्षिण पश्चिम विभागाचे कमांडिंग इन चीफ एयर मार्शल एच. एस. अरोरा यांना  ओझर ११ बेस रिपिएर डेपोत (बीआरडी)शुक्रवारी वायुसेनेला हस्तांतरीत केले. ११ बीआरडीला या विमानाची संपूर्ण देखभाल दुरुस्ती करण्यासाठी तब्बल १७ ते १८ महिन्यांचा कालावधी लागल्यानंतर उर्वरित दोन महिन्यात यशस्वीरीत्या चाचणी घेऊन  हे विमान भारतीय वायुसेनेला सुुपुर्द करण्यात आले आहे.

Overload first Sukhoi 30 MKI aircraft to Operation Kawadan in Ozar 11 BRD | ११ बीआरडीत ओव्हरॉल्ड पहिल्या सुखोईचे वायुसेनेच्या ऑपरेशन स्क्वॉडनला हस्तांतरण

११ बीआरडीत ओव्हरॉल्ड पहिल्या सुखोईचे वायुसेनेच्या ऑपरेशन स्क्वॉडनला हस्तांतरण

Next
ठळक मुद्दे११ बीआरडीत सुखोई 30 एमकेआय स्वदेशी यंत्रणेकडून ओव्हरॉल ओव्हरॉल्ड सुखोई वायुसेनेच्या स्क्वॉडनला हस्तांतरीत ओझर येथे रंगला दिमाखदार हस्तांतरण सोहळा

नाशिक : भारतीय वायुसेनेनेच्या लढाऊ विमानांच्या दुरुस्ती व देखभालविभागाने संपूर्णपणे स्वदेशी यंत्रणा वापरून ओव्हरॉल्ड केलेल्या पहिल्या सुखोई ३० एमके आय एयर मार्शल हेमंत शर्मा यांनी दक्षिण पश्चिम विभागाचे कमांडिंग इन चीफ एयर मार्शल एच. एस. अरोरा यांना  ओझर ११ बेस रिपिएर डेपोत (बीआरडी)शुक्रवारी (दि. २६)  वायुसेनेला हस्तांतरीत केले. ११ बीआरडीला या विमानाची संपूर्ण देखभाल दुरुस्ती करण्यासाठी तब्बल १७ ते १८ महिन्यांचा कालावधी लागल्यानंतर उर्वरित दोन महिन्यात यशस्वीरीत्या चाचणी घेऊन  हे विमान भारतीय वायुसेनेला सुुपुर्द करण्यात आले आहे. ओझर ११ बीआरडीच्या इतिहासात २६ आॅक्टोबरचा दिवस सुवर्णाक्षरणांनी लिहिला गेला आहे. येथे संपूर्णपणे स्वदेशी यंत्रणेद्वारे  सुखोई ३० एमकेआय संपूर्ण ओव्हरॉल्ड करून ११ बीआरडीने आपली क्षमता पुन्हा सिद्ध केली असून शुक्रवारी ओझर येथे औपचारिक सोहळ््याच्या मआध्यमातून हे विमान भारतीय वायुसेनेच्या आॅपरेशनल स्वाकडनला सुपुर्द करण्यात आले आहे. यावेळी एअर कमोडोर समीर बोराडे यांच्यासह वायुसेनेच्या नवी दिल्ली येथील मुख्यालयासह नागपूर व दक्षिण-पश्चिम विभाग मुख्यालय गांधीनगर येथील वरिष्ठ अधिकारी तसेच एचएएलचे वरिष्ठ अधिकारी, डीआरडीओ, डीजीएक्यूए चे  वरिष्ठ अधिकारी उपस्थित  होते.  दरम्यान, संपूर्ण ओव्हरॉल्ड सुखोई ३० एमकेआय विमानामुळे भारतीय वायुसेनेची ताकद वाढली असून फेब्रुवारी महिन्यात आणखी एक विमान वायुसेनेला हस्तांतरीत करण्यात येणार असल्याची माहिती एअर मार्शल हेमंत शर्मा यांनी दिली आहे.  

५० टक्के मिग २९ चे अद्यावतीकरण 
भारतीय वायु सेनेचे मुख्य देखभाल दुरुस्ती केंद्रांपैकी  ११ बीआरडी एक असून येथे मिग २९, सुखोई ३० एमकेआय,एसयू ७स मिग-२१ व  मिग २८, मिग-२३ सारख्या लढाऊ विमानांची देखभाल व दुरूस्तीची कामे यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली आहेत. १९८८ मध्ये प्रथम मिग-२३ विमानांची मध्यम व किर कोळ स्वरुपाची देखभाल दुरुस्ती सुरु झाल्यानंतर २४८ मिग-२३ विमानांची संपूर्ण देखभाल व दुरूस्तीचे काम २०१५ मध्ये पूर्ण करण्यात आले. तर वर्ष १९९६ पासून मिग-२९ विमानांच्या देखभाल व दुरूस्तीच्या काम येथे सुरू असून यातील ५० टक्के विमानांचे अदयतीकरणाची प्रक्रीया पूर्ण झाली आहे.

Web Title: Overload first Sukhoi 30 MKI aircraft to Operation Kawadan in Ozar 11 BRD

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.