रात्रीतून उभारलेले पत्र्याचे शेड जमीनदोस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2020 11:53 PM2020-02-08T23:53:23+5:302020-02-09T00:24:50+5:30
मनपा मालकीच्या सर्व्हे क्रमांक ११५ मधील भूखंडावर एका रात्रीतून उभारलेले अतिक्रमित पत्र्याचे शेड नगरसेवक मुस्तकीम डिग्निटी व नागरिकांनी महापालिकेच्या जेसीबीच्या साहाय्याने जमीनदोस्त केले आहे.
मालेगाव मध्य : मनपा मालकीच्या सर्व्हे क्रमांक ११५ मधील भूखंडावर एका रात्रीतून उभारलेले अतिक्रमित पत्र्याचे शेड नगरसेवक मुस्तकीम डिग्निटी व नागरिकांनी महापालिकेच्या जेसीबीच्या साहाय्याने जमीनदोस्त केले आहे.
शहराला अतिक्रमणाने विळखा घातला आहे. खासगी जागांसह महापालिकेच्या भूखंडावर अतिक्रमण केले जाते. शहरातील सर्व्हे क्र. १५६ मध्ये जामीया अग्निशमन केंद्राच्या पाठीमागे महापालिकेने सार्वजनिक शौचालयासाठी आरक्षित केलेला भूखंड आहे. या भूखंडावर शुक्रवारी रात्री अचानक पत्र्याचे शेड उभारण्यात आले. शनिवारी सकाळी हा प्रकार नागरिकांच्या निदर्शनास आला. नागरिकांनी याबाबत अतिक्रमण- धारकास विचारले असता त्याने परवानगी असल्याचे सांगितले. नागरिकांनी याबाबत नगरसेवक मुस्तकीम डिग्निटी यांच्याकडे तक्रार केली. त्यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत मनपाच्या जेसीबीच्या साहाय्याने अतिक्रमण जमीनदोस्त केले. जागरूक नागरिक व लोकप्रतिनिधींच्या सजगतेमुळे मनपाच्या जागेवरील झालेले अतिक्रमण हटल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात
आहे.