वेळीच व्हा सावध! इअरफोनचा अतिवापर, बहिरेपणाला आमंत्रण; 'असे' आहेत दुष्परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2022 05:13 PM2022-02-04T17:13:16+5:302022-02-04T17:17:43+5:30

नाशिक - इअरफोन किंवा ब्लूटूथच्या अतिवापरामुळे युवकांमध्ये कानांच्या आजाराचे प्रमाण वाढत असल्याचे निरीक्षण तज्ज्ञांकडून नोंदविले जात आहे. बस, रेल्वे, बाइकवरून ...

Overuse of earphones, inviting deafness; These are the side effects | वेळीच व्हा सावध! इअरफोनचा अतिवापर, बहिरेपणाला आमंत्रण; 'असे' आहेत दुष्परिणाम

वेळीच व्हा सावध! इअरफोनचा अतिवापर, बहिरेपणाला आमंत्रण; 'असे' आहेत दुष्परिणाम

Next

नाशिक - इअरफोन किंवा ब्लूटूथच्या अतिवापरामुळे युवकांमध्ये कानांच्या आजाराचे प्रमाण वाढत असल्याचे निरीक्षण तज्ज्ञांकडून नोंदविले जात आहे. बस, रेल्वे, बाइकवरून प्रवास करताना किंवा पायी चालताना हेडफोन किंवा ब्लूटूथद्वारे गाणी ऐकणे, मोबाइलवर बोलण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र, या गॅझेटचा अतिवापर कानांच्या दुखण्यांबरोबरच रक्तदाब, नैराश्य, चिडचिडेपणा व मानसिक आजारांना निमंत्रण देत आहे. वाहनांच्या आवाजाने त्रास अनेक जण इअरफोन कानाला लावून गाणी ऐकत प्रवास करणे पसंत करतात. मात्र, आता या कृत्रिम ध्वनी प्रदूषणाचा धोका अधिक वाढला आहे.

आरोग्य संघटना म्हणते...

जागतिक आरोग्य संघटनेच्या २०१९ मधील संशोधनाच्या अहवालानुसार जगातील ११० कोटी लोकांना बहिरेपणाचा धोका आहे. या अहवालानुसार कानामध्ये रोज हेडफोन लावून मोठ्याने गाणी ऐकण्याची सवय असणाऱ्यांना बहिरेपणा येण्याचा धोका अधिक आहे. त्यात १२ ते ३५ वयोगटातील संख्या अधिक आहे.

कानांची आवाज सहन करण्याची क्षमता

सामान्य व्यक्ती ८५ डेसिबलपर्यंतचा आवाज आठ तासांसाठी किंवा १०० डेसिबलचा आवाज १५ मिनिटांसाठी सहन करू शकते. मात्र, यापेक्षा जास्त आवाज कानावर पडत राहिल्यास बहिरेपण येऊ शकतो. दैनंदिन जीवनामध्ये एकमेकांशी साधला जाणारा संवाद हा ६० डेसिबल इतक्या आवाजात असतो. सतत हेडफोनवर गाणी ऐकणाऱ्यांच्या कानावर १०५ डेसिबल इतका आवाज पडत असतो. चार मिनिटांपेक्षा अधिक काळ एवढा मोठा आवाज कानावर पडत राहिल्यास त्याचा त्रास होऊ शकतो.

वयोमानामुळे ज्येष्ठांमध्ये कानांचे आजार बळावू शकतात. मात्र, अलीकडे काही वर्षांपासून मोबाइल, हेडफोनच्या अतिवापरामुळे युवकांमध्ये या आजाराचे प्रमाण वाढले आहे. ब्लूटूथ, हेडफोनच्या अतिवापरामुळे ऐकू न येणे व त्यासंबंधी वेगवेगळे आजार वाढू शकतात.

- डॉ. शामला कनडे, कान-नाक-घसातज्ज्ञ

असे आहेत दुष्परिणाम

हेडफोनच्या अतिवापरामुळे ऐकायला कमी येणे, स्पष्टपणे ऐकू न येणे, रक्तदाब, मानसिक आजार उदभवू शकतात. हे टाळण्यासाठी अतिकर्कश आवाजाच्या ठिकाणी जाणे टाळावे,

कानात काडी, पेन किंवा चावी अशा वस्तू घालू नये, मोबाइल हेडफोन, ब्लूटूथचा अतिवापर टाळावा, कानांत पाणी साठणार नाही याची काळजी घ्यावी, अतिआवाजाच्या ठिकाणी कानांमध्ये कापसाचा बोळा किंवा अन्य सुरक्षित उपकरणांचा वापर करावा.

 

Web Title: Overuse of earphones, inviting deafness; These are the side effects

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.