आढाव्यातच मानला ‘गोडवा’ महिला बालकल्याण समिती बैठक, कुपोषण, बालमृत्यूवर मौन
By admin | Published: January 21, 2015 02:06 AM2015-01-21T02:06:02+5:302015-01-21T02:06:23+5:30
आढाव्यातच मानला ‘गोडवा’ महिला बालकल्याण समिती बैठक, कुपोषण, बालमृत्यूवर मौन
नाशिक : महिला व बालकांच्या दृष्टीने महत्त्वाची असलेली महिला व बालकल्याण समितीच्या मासिक बैठकीत गर्भवती महिलांच्या आरोग्य तपासणीसह बालकांचे सर्वेक्षण, कुपोषणाचा व बालमृत्यूचा आढावा घेणे अपेक्षित असताना केवळ बालकांचे लसीकरण व मुलांच्या आरोग्य तपासणी पुरताच समितीने आढावा सिमीत ठेवल्याने याबाबत जिल्'ात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे या समितीवर खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या पत्नी कलावती चव्हाण यांच्यासह विभागाच्या कामकाजाचा अनुभव असलेल्या माजी महिला व बालकल्याण सभापती सुनीता अहेर तसेच सर्वसाधारण सभांमधून नेहमीच आक्रमक भूमिका घेणाऱ्या सोनाली पवार यांचासमावेश असतानाही विभागाचा आढावा मर्यादित राहिल्याने तो एक चर्चेचा विषय ठरला आहे. महिला बालकल्याण समितीची मासिक बैठक सभापती शोभा सुरेश डोखळे यांच्या उपस्थितीत मंगळवारी (दि.२०) झाली. बैठकीत आरोग्य विषयक कामांचा व एकात्मिक बालविकास सेवा योजनेचा आढावा घेतला असता जिल्'ात बालकांचे लसीकरणाचे काम ७५ टक्के पूर्ण झालेले असून, शालेय मुलांचे आरोग्य तपासणीचे काम ९५ टक्के झालेले आहे. उपमुख्य कार्यकारी अधिकारी उद्धव ठाकरे यांनी अंगणवाडी बालकांचे आरोग्य तपासणीचे काम १०० टक्के पूर्ण करण्याच्या दृष्टीने सूचना दिल्यात. प्रकल्प अधिकाऱ्यांनी प्रकल्पांचा आढावा दिला तसेच सुकन्या योजनेची माहिती व तांत्रिक प्रशिक्षण कार्यक्रमाचा आढावा घेण्यात आला. जिल्'ात मोठ्या प्रमाणावर एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांची पदे रिक्त असूनही कार्यरत अधिकाऱ्यांनी चांगले काम केल्याबाबत समाधान व्यक्त केले. बैठकीस सुनीता अहेर, कलावती चव्हाण, सुरेखा जिरे, शीला गवारे, सुरेखा गोधडे, सीमा बस्ते, सोनाली पवार आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)