द्राक्ष व्यापाऱ्याच्या मुनीमाची आत्महत्त्या

By admin | Published: March 8, 2017 01:35 AM2017-03-08T01:35:35+5:302017-03-08T01:35:51+5:30

निफाड : द्राक्ष व्यवहाराच्या पैशांवरून शेतकऱ्यांनी केलेली मारहाण व जिवे मारण्याच्या धमक्या दिल्याने द्राक्ष व्यापाऱ्याच्या मुनीमजीने विषारी औषध पिऊन आत्महत्त्या केल्याची घटना उगाव येथे घडली.

The owner of the grape trader's suicide | द्राक्ष व्यापाऱ्याच्या मुनीमाची आत्महत्त्या

द्राक्ष व्यापाऱ्याच्या मुनीमाची आत्महत्त्या

Next

निफाड : द्राक्ष व्यवहाराच्या पैशांवरून शेतकऱ्यांनी केलेली मारहाण व जिवे मारण्याच्या धमक्या दिल्याने द्राक्ष व्यापाऱ्याच्या मुनीमजीने विषारी औषध पिऊन आत्महत्त्या केल्याची घटना उगाव येथे घडली. या प्रकरणी उगाव येथील पाच जणांविरु द्ध निफाड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. संशयित आरोपींना अटक करून कडक कारवाई करावी, या मागणीसाठी उगाव येथे मंगळवारी बंद पाळण्यात आला. मृताच्या नातेवाईक व मित्रपरिवाराने निफाड तहसीलवर मोर्चा काढला.
या प्रकरणी मयताची पत्नी अरु णा रविराज वाघ यांनी निफाड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, उगाव येथील बाळासाहेब जगन्नाथ ढोमसे यांनी तारीफशेठ  या व्यापाऱ्याला द्राक्षे विक्र ी केली होती; परंतु ढोमसे यांचे या व्यवहाराचे पैसे तारीफशेठकडे बाकी होते. ते मिळत नसल्याने गुरु वार, दि. २ रोजी द्राक्ष व्यापारी तारीफशेठ यांचे मध्यस्थ रविराज कमलाकर वाघ (३३) यांना ढोमसे कुटुंबातील सदस्य कल्याण विजय ढोमसे यांच्या जिममध्ये घेऊन गेले. जिममध्ये द्राक्षाच्या पैशांवरून कुरापत काढून लोखंडी पाइपने वाघ यांना मारहाण केली. त्यानंतर ढोमसे कुटुंबातील सदस्यांनी वाघ यांच्याकडे मोबाइलवरून द्राक्षाच्या पैशांची मागणी केली. या व्यवहारात तू मध्यस्थी केली, आमचे द्राक्षाचे पैसे दिले नाही तर तुला व तुझ्या कुटुंबाला संपवून टाकू, असा दम देऊन शिवीगाळ करून धमक्या दिल्या. या सर्व जाचाला कंटाळून रविराज वाघ यांनी दि. ४ मार्च रोजी विषारी औषध सेवन केले. त्यांना उपचारासाठी निफाड येथील खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. परंतु सोमवार, दि. ६ रोजी रात्री उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. ही घटना समजताच मयताच्या नातेवाइकांनी संताप व्यक्त केला. वाघ यांना आत्महत्त्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी बाळासाहेब जगन्नाथ ढोमसे, पंडित बाळासाहेब ढोमसे, योगेश बाळासाहेब ढोमसे, शिवलाल भाऊसाहेब ढोमसे, कल्याण विजय ढोमसे या पाच संशयित आरोपींविरु द्ध निफाड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणी अधिक तपास निफाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजित डेरे करीत आहेत.
निफाड तहसील येथे वाघ यांच्या नातेवाइकांनी पोलीस उपअधीक्षक दीपक गिऱ्हे, तहसीलदार विनोद भामरे, पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांची भेट घेतली. या गुन्ह्यातील संशयित आरोपींना तातडीने अटक करा, त्यांच्यावर कडक कारवाई करा, अशी मागणी केली. गिऱ्हे व भामरे यांनी या प्रकरणात सखोल तपास केला जाईल व संशयित आरोपींवर कडक कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले. नातेवाइकांची समजूत काढल्यानंतर वाघ यांचा मृतदेह नातेवाइकांनी ताब्यात घेतला. उगाव येथे शोकाकुल वातावरणात वाघ यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत वाघ यांची घरची परिस्थिती गरिबीची असून, त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ उगाव येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. शिवाय मंगळवारी भरणारा आठवडे बाजारही रद्द करण्यात आला होता.
मयत वाघ यांच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी निफाड येथील उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आली. वाघ यांना आत्महत्त्येस प्रवृत्त करणाऱ्या ढोमसे कुटुंबातील पाच जणांविरु द्ध कडक कारवाई करावी, त्यांना कडक शासन मिळावे, अशी मागणी करीत मंगळवारी (दि. ७) मयत वाघ यांचा मृतदेह निफाड उपजिल्हा रु ग्णालयातून ताब्यात घेण्यास वाघ यांच्या नातेवाइकांनी नकार दिला. नातेवाइकांनी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष शंकर वाघ यांच्या नेतृत्वाखाली निफाड तहसीलवर मोर्चा काढला.

Web Title: The owner of the grape trader's suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.