लायन्स क्लब पंचवटीकडून ऑक्सिजन बँक !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:11 AM2021-06-01T04:11:12+5:302021-06-01T04:11:12+5:30
नाशिक : लायन्स क्लब नाशिक पंचवटीच्या वतीने नुकतेच ऑक्सिजन बँकेचे लोकार्पण करण्यात आले. या लायन्स क्लबद्वारे गतवर्षात कोविडच्या प्रारंभापासून ...
नाशिक : लायन्स क्लब नाशिक पंचवटीच्या वतीने नुकतेच ऑक्सिजन बँकेचे लोकार्पण करण्यात आले. या लायन्स क्लबद्वारे गतवर्षात कोविडच्या प्रारंभापासून धान्य वाटपासाठी फूड बँकेची स्थापना करून शेकडो कुटुंबांना २७ क्विंटल धान्य वाटप करण्यात आले.
या ऑक्सिजन बँकेचे औपचारिक उद्घाटन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर यांच्या हस्ते करण्यात आले. ठक्कर डोम कोविड सेंटरला ही ऑक्सिजन बँक गरजूंसाठी उपलब्ध राहणार आहे. दुसऱ्या लाटेवेळी या स्वरूपाच्या बँक स्थापन करून सामाजिक संस्थांनी समाजाच्या आरोग्याची गरज भागविल्यानेच आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी होण्यास व आरोग्ययंत्राणांविषयी विश्वास व्यक्त होतो, असे सांगून उपक्रमाचे कौतुक केले. सुरुवातीला ४ ऑक्सिजन मशीन उपलब्ध केल्या असून, या प्रत्येकी ९ लिटरच्या व उत्कृष्ट प्रतीच्या असल्याचे अध्यक्ष सुनील देशपांडे यांनी सांगितले.
या सर्व मशीन लोकसहभागातून मिळाल्या असून, क्लबच्या कार्याची दखल घेऊन समाज मदतीसाठी पुढे येतो हे पुन्हा सिद्ध झाल्याचे मत माजी प्रांतपाल वैद्य विक्रांत जाधव यांनी व्यक्त केले. याचा अनेकांना लाभ होणार असल्याचे अध्यक्ष नंदेश यंदे यांनी सांगितले. लोकसहभाग अधिक वाढणार असल्याने मशिन्सची संख्यादेखील वाढेल, असा विश्वास अरुण अमृतकर यांनी व्यक्त केला. या मशिन्सचा उपयोग केवळ कोविडसाठी होणार नसून ज्या कुणाला ऑक्सिजनची गरज लागेल त्या सर्वांसाठी विशेष करून वृद्धाश्रमामध्ये असलेल्या वृद्ध व्यक्तींना मोफत उपलब्ध, तर इतरांना नाममात्र रक्कम घेऊन सेवा उपलब्ध होईल, असे खजिनदार प्रशांत सोनजे यांनी सांगितले. प्रस्तावित विभागीय अध्यक्ष सागर बोंडे यांनी ऑक्सिजन मशीनमुळे सेवाकार्य उत्तम होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला. प्रांतपाल अभय शास्त्री यांनी दृकश्राव्य माध्यमातून उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. यावेळी रमेश चौतालिया, विजय बाविस्कर, नीरज वर्मा, अमित कोतकर, सचिव सुजाता कोहोक, रितू चौधरी, वैद्य नीलिमा जाधव यांची उपस्थिती होती.
इन्फो
फूड बँकेकडून १५००० किलो धान्य वाटप
गत वर्षापासून फूड बँकेच्या माध्यमातून अत्यंत गरजू अशा ५५० हून अधिक परिवारांना तब्बल २७०० किलो पीठ वाटण्यात आले. त्याचे प्रकल्प संयोजक विजय बाविस्कर होते, तसेच यंदाच्या वर्षी एकूण १५००० किलोहून अधिक धान्य, पंचवटी फूड बँक व क्लबच्या वतीने वाटप करण्यात आल्याचे फूड बँकेच्या सदस्य वैद्य नीलिमा जाधव यांनी सांगितले.