आॅक्सिजन : राष्टÑवादी आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2020 11:44 PM2020-09-07T23:44:14+5:302020-09-08T01:31:18+5:30
नाशिक : कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, गंभीर आजारी रुग्णांना आॅक्सिजनची आवश्यकता भासत आहे. यामुळे लिक्विड आॅक्सिजनची मागणी वाढली असून, आॅक्सिजनच्या कमतरतेमुळे सिलिंडरचे दर वाढले आहेत. लिक्विड आॅक्सिजनचा पुरवठा सुरळीत करून अवाजवी दर नियंत्रणात आणावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने केली आहे. यासंदर्भात अन्न-औषध प्रशासन विभागाच्या सहआयुक्त माधुरी पवार यांना शहराध्यक्ष रंजन ठाकरे व शिष्टमंडळाने निवेदन दिले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

शहरात कोरोनाबाधित रु ग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, लिक्विड आॅक्सिजनच्या कमतरतेमुळे रु ग्णांना आपला जीव गमवावा लागत आहे. नाशिकला लिक्विड आॅक्सिजनचा पुरवठा दोन-तीन दिवसानंतर होत आहे.
कोरोना संकटापूर्वी आॅक्सिजन सिलिंडरची कमी प्रमाणात आवश्यकता होती; परंतु कोरोना विषाणूमुळे रु ग्णांची संख्या वाढल्याने आॅक्सिजन सिलिंडरची मागणी दहा पटीने वाढली आहे. यात दोन-तीन दिवसानंतर लिक्विड आॅक्सिजनचा पुरवठा कमी प्रमाणात होत असून, वाढत्या रु ग्णांची संख्या बघता तो तातडीने वाढविणे गरजेचे झाले आहे. यावेळी युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे तसेच जीवन रायते, मकरंद सोमवंशी, समाधान तिवडे, चेतन कासव, बाळा निगळ, नीलेश भंदुरे, सचिन जोशी, नीलेश कर्डक आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी घेतलेल्या निर्णयानुसार साथरोग नियंत्रण कायदा व आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील तरतुदींचा वापर करीत प्राणवायू उत्पादन करणाऱ्यांना वैद्यकीय क्षेत्रासाठी ८० टक्के आणि उद्योगांसाठी २० टक्के प्राणवायू देण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे आॅक्सिजन सिलिंडरच्या वाढत्या मागणीमुळे सिलिंडरचे दर अप्रत्यक्षपणे वाढून त्याचा काळाबाजार होणार नाही याकडेही लक्ष देण्याची मागणी दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.