बीएआयतर्फे दोन ग्रामीण रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन प्लांट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:16 AM2021-05-07T04:16:05+5:302021-05-07T04:16:05+5:30

नाशिक : बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया (बीएआय)च्या नाशिक शाखेकडून जिल्ह्यातील गिरणारे व सिन्नर येथील ग्रामीण रुग्णालयात स्वयम् ऑक्सिजन ...

Oxygen plants in two rural hospitals by BAI | बीएआयतर्फे दोन ग्रामीण रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन प्लांट

बीएआयतर्फे दोन ग्रामीण रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन प्लांट

Next

नाशिक : बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया (बीएआय)च्या नाशिक शाखेकडून जिल्ह्यातील गिरणारे व सिन्नर येथील ग्रामीण रुग्णालयात स्वयम् ऑक्सिजन युनिट उभारणी करण्यात आली आहे. त्यापैकी गिरणारे येथील प्लांटचे लोकार्पण गुरुवारी (दि.६) करण्यात आले असून, सिन्नर येथील प्लांट पुढील तीन दिवसात कार्यरत होणार असल्याची माहिती बीएआयतर्फे देण्यात आली आहे.

बीआयएकडून उभारण्यात आलेल्या या स्वयम् ऑक्सिजन युनिटच्या माध्यमातून गिरणारे येथे प्रतितास ५ एनएमक्यू व सिन्नर येथे १० एनएमक्यू ऑक्सिजनची निर्मिती करण्यात येणार असल्याची माहिती बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या नाशिक शाखेचे अध्यक्ष अभय चोकसी यांनी दिली आहे. या दोन्ही ऑक्सिजन निर्मिती प्लांटची एकूण किंमत सुमारे ३६ लाख रुपये असून, प्लांटसोबत अखंड वीजपुरवठ्यासाठी जनरेटरही संस्थेतर्फे उपलब्ध करून देण्यात आले आहे. बिल्डर्स असोसिएशन कोरोना संकटकाळात सामाजिक दायित्व म्हणून नागरिकांच्या मदतीस धावून आली असून, या उपक्रमामध्ये संस्थेचे सचिव विजय बाविस्कर, उपाध्यक्ष मनोज खांडेकर तसेच माजी राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश पाटील तसेच सर्व सदस्यांचा सक्रिय सहभाग नोंदवला आहे.

===Photopath===

060521\06nsk_29_06052021_13.jpg

===Caption===

गिरणारे येथील ऑक्सिजन प्लांटचे लोकार्पण करताना खासगार हेमंत गोडसे. समवेत बीएआयचे अध्यक्ष अभय चोकसी, विजय बाविस्कर, मनोज खांडेकर,अविनाश पाटील आदी.

Web Title: Oxygen plants in two rural hospitals by BAI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.