मोठ्या सर्व रुग्णालयांना ऑक्सिजन प्रकल्प बंधनकारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 10:54 PM2021-06-03T22:54:38+5:302021-06-04T01:18:15+5:30
नाशिक : कोरोनाकाळातील ऑक्सिजन बेडसाठी झालेली धावपळ लक्षात घेता आता पन्नासपेक्षा अधिक बेडस असलेल्या सर्व खासगी रुग्णालयांना ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारणे बंधनकारक करण्यात आले आहेत. त्यामुळे अशा सर्व रुग्णालयांची तपासणी करून माहिती संकलित करण्याचे आदेश आयुक्त कैलास जाधव यांनी दिले आहेत.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन बेडअभावी निर्माण झालेली अवस्था बघून आयुक्त कैलास जाधव यांनी पन्नास बेड असलेल्या सर्वच खासगी रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाची सक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे.
शहरातील अशा रुग्णालयांची पाहणी करून यासंदर्भातील वस्तुस्थितीदर्शक अहवाल तयार करण्यासाठी आयुक्तांनी विभागनिहाय नोडल ऑफिसर नियुक्त करण्याचे आदेश वैद्यकीय विभागाला खातेप्रमुखांच्या बैठकीत देण्यात आले आहेत.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत बालकांना धोका असल्याचे सांगितले जात आहे. पार्श्वभूमीवर शहरातील लहान मुलांच्या रुग्णालयांची यादी तयार करण्याबाबत डॉ. आवेश पलोड यांना आदेशित करण्यात आले आहे. कोरोना टाळण्यासाठी कोणती दक्षता घ्यावी, यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपाययोजनांबाबतचे व्हिडिओ तयार करण्यात येणार आहे. ते समाजमाध्यमांमध्ये टाकण्याची सूचना आयुक्तांनी केली आहे.