ऑक्सिजन, सॅनिटायझर मास्क उद्योगांना चालना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:15 AM2021-03-23T04:15:10+5:302021-03-23T04:15:10+5:30
गोकुळ सोनवणे, सातपूर : कोरोनाचे संकट आले आणि आरोग्य क्षेत्रातील अनेक उणिवा स्पष्ट झाल्या. पुरेसा ऑक्सिजन ना व्हेंटिलेटर, मास्क ...
गोकुळ सोनवणे, सातपूर : कोरोनाचे संकट आले आणि आरोग्य क्षेत्रातील अनेक उणिवा स्पष्ट झाल्या. पुरेसा ऑक्सिजन ना व्हेंटिलेटर, मास्क ना सॅनिटाझर... संकटातील हे आणखी संकट, परंतु त्यातून मार्ग काढण्यासाठी शासकीय यंत्रणांनी नियमांमध्ये आणलेली शिथिलता आणि अन्य उद्योजकांनी त्यांना दिलेली साथ यामुळे नाशिकमध्ये कोरोना काळात वैद्यकीय उपकरणांची गरज भागविली गेली. देशपातळीवर तर महिंद्राच्या इगतपुरी प्लांटमध्ये उत्पादित झालेली व्हेंटिलेटर्स अत्यंत उपकारक ठरली. केरोना काळात एन ९५ मास्क पासून सॅनिटायझरसह अनेक वैद्यकीय साहित्याची टंचाई जाणवू लागली. या साहित्याचा काळाबाजार देखील सुरू झाला. त्यातच कोरोनाचे रुग्ण हळूहळू मोठ्या प्रमाणात वाढू लागले. या रुग्णांना ऑक्सिजन अत्यावश्यक होता. बाहेरून ऑक्सिजन मागविला जात असे. कारण नाशिकमध्ये कमी प्रमाणात उत्पादित केला जात होता. ऑक्सिजनचा तुटवडा लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने उद्योगांचा ऑक्सिजन पुरवठा रद्द करुन तो रुग्णांना उपलब्ध देण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्याचवेळी अन्न व औषध प्रशासन सहआयुक्त माधुरी पवार यांनी ऑक्सिजन उत्पादन करू इच्छिणाऱ्या उद्योगांना तत्काळ परवानगी उपलब्ध करून दिल्याने जिल्ह्यात मुबलक ऑक्सिजनचे उत्पादन सुरू झालेले आहे. सॅनिटायझरचा काळाबाजार सुरू झाल्याने यासंदर्भातदेखील परवानगीबाबत लवचिकता आणल्याने जिल्ह्यात जिल्ह्यात सहा आणि विभागात १७ सॅनिटायझर उत्पादन करणारे उद्योग सुरू झालेले आहेत. कोरोनाच्या निमित्ताने नाशिक जिल्हा ऑक्सिजन आणि सॅनिटायझर उत्पादनात स्वयंपूर्ण ठरला आहे.
इन्फो...
पहिला पीपीई किटचा उद्योग
कोरोना काळात अनेक नव्या संकल्पना सामान्य नागरिकांना कळाल्या. पीपीई किट हा त्यातीलच प्रकार. सुरुवातीला पीपीई किट उपलब्ध होत नसल्याने वैद्यकीय व्यावसायिकही कचरत होते. त्यानंतर मात्र, नाशिकमध्येच अमेाल चौधरी या उद्योजकाने अशाप्रकारचे पीपीई किट तयार करण्यास तयार करण्यास प्रारंभ केला. अशाच प्रकारे अनेक उद्योजकांनी विविध उत्पादने घेण्यास प्रारंभ केला.
इन्फो..
कोरोनापूर्वी नाशिकमध्ये ऑक्सिजन उत्पादन करणाऱ्या सहा उद्योग ४५ मेट्रिक टन उत्पादन करीत होत्या. उद्योगांसह रुग्णालयांना पुरवठा केला जात असे आणि कोरोना रुग्णांसाठी २७ मेट्रिक टन ऑक्सिजनची मागणी होती. त्यानंतर नवीन तीन उद्योग सुरू झाल्याने एकूण नऊ कारखान्यांमधून दररोज ९५ ते १०५ मेट्रिक टन ऑक्सिजन उत्पादन केला जातो. अतिरिक्त ४२ मेट्रिक टन उत्पादन करण्याची क्षमता आहे.
इन्फो..
कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्याने कठीण परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी आवाहन करून तत्काळ परवानगी उपलब्ध करून दिल्याने तीन ऑक्सिजन कारखाने सुरू झाले आहेत. त्यामुळे नाशिकमध्ये आता ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होणार नाही. जिल्ह्यासह विभागात २५ डिस्टलरींना
परवानगी दिल्याने मुबलक सॅनिटायझर उपलब्ध झाले आहे.
कोट...
गेल्या वर्षी रेमडेसिवीर इंजेक्शन मिळत नसल्याच्या तक्रार होत्या. यंदा कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने
रेमडेसीव्हर उत्पादन कंपन्यांशी थेट संपर्क साधून ५ हजार ४०० रुपयांना मिळणारे इंजेक्शन सामान्य नागरिकांना अवघ्या १२०० रुपयांत उपलब्ध करून दिले आहे.
- माधुरी पवार, सहआयुक्त अन्न व औषध प्रशासन नाशिक विभाग.
===Photopath===
220321\22nsk_5_22032021_13.jpg
===Caption===
माधुरी पवार