लिक्विड पुरवठ्याअभावी आॅक्सिजनची टंचाई

By संजय पाठक | Published: September 6, 2020 01:39 AM2020-09-06T01:39:57+5:302020-09-06T01:41:55+5:30

कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने आता आॅक्सिजनची मागणीदेखील वाढत आहे. नियमित मागणीपेक्षा ही मागणी पाच पट वाढली आहे. तथापि, मुंबई-पुणे आणि तत्सम ठिकाणांहून लिक्विड आॅक्सिजनचा पुरवठा होत नसल्याने स्थानिक पुरवठादार हतबल झाले आहेत. आता क्षमतेपेक्षा पुरवठा करणे शक्य नसल्याने त्यांनी तसे जिल्हा शासकीय रुग्णालय आणि महापालिकेला कळवले आहे. त्यामुळे आता शेकडो रुग्ण आॅक्सिजनवर आहेत.

Oxygen scarcity due to lack of liquid supply | लिक्विड पुरवठ्याअभावी आॅक्सिजनची टंचाई

लिक्विड पुरवठ्याअभावी आॅक्सिजनची टंचाई

googlenewsNext
ठळक मुद्देमागणीनुसार पुरवठाच नाही : मुंबई-पुण्याहून दिवसाआड विलंबाने येतात टँकरपुरवठादार हतबल; यंत्रणांना दिले पत्र

नाशिक : कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने आता आॅक्सिजनची मागणीदेखील वाढत आहे. नियमित मागणीपेक्षा ही मागणी पाच पट वाढली आहे. तथापि, मुंबई-पुणे आणि तत्सम ठिकाणांहून लिक्विड आॅक्सिजनचा पुरवठा होत नसल्याने स्थानिक पुरवठादार हतबल झाले आहेत. आता क्षमतेपेक्षा पुरवठा करणे शक्य नसल्याने त्यांनी तसे जिल्हा शासकीय रुग्णालय आणि महापालिकेला कळवले आहे. त्यामुळे आता शेकडो रुग्ण आॅक्सिजनवर आहेत.
दरम्यान, जिल्हा शासकीय रुग्णालयाने आता मागणीतील वाढ बघता अन्य पुरवठादारांचा शोध सुरू केला असून, नाशिक महापालिकेने तर थेट निविदाच मागवल्या आहेत. तथापि, मुंबई- पुण्याकडून किमान एक ते दोन दिवसाआड पुरवठा होत असेल तर त्यावर तातडीचे पर्याय काय, याबाबत मात्र स्पष्टीकरण होऊ शकलेले नाही.
नाशिक शहरात जिल्हा शासकीय रुग्णालयात कोरोनापूर्वी २५ ते ३० आॅक्सिजन सिलिंडर लागत होते ते आता चारशेपर्यंत गेल्याचे सांगण्यात येत आहे. ग्रामीण रुग्णालयांसाठी लागणारे सिलिंडर वेगळेच. नाशिक महापालिकेच्या बिटको आणि डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातदेखील शंभर ते सव्वाशे सिलिंडर पोहोचवले जात आहेत. कोरोनापूर्वी इतकी आॅक्सिजनची गरज नव्हती. मात्र आता ती वाढतच असून, दहा पटीत वाढल्याचे सांगितले जात आहे. शासकीय यंत्रणा मात्र चार ते पाच पटच आॅक्सिजनची मागणी वाढल्याचा दावा करीत आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून लिक्विड गॅस तयार करणाऱ्या मुंबई, चाकण, मुरबाडसह अन्य ठिकाणांहून होणाºया पुरवठ्यात घट झाली आहे. विलंबामुळे मिळणाºया लिक्विडमुळे रुग्ण मात्र अडचणीत येण्याची शक्यता आहे.
मविप्रच्या रुग्णालयातही प्रतीक्षा
महापालिकेच्या ताब्यात मविप्रचे डॉ. वसंत पवार वैद्यकीय रुग्णालयाचा ताबा देण्यात आला आहे. तेथे साठ आॅक्सिजन बेड उपलब्ध होणार आहेत. मात्र ते केवळ याच कारणाने रखडले आहेत. मात्र, सध्या या ठिकाणी आॅक्सिजनसाठी टाकीचे काम सुरू असून, ते पूर्ण झाल्यानंतर हे बेड्स उपलब्ध होतील, असे मनपाच्या वतीने सांगण्यात आले. मात्र सध्यातरी आॅक्सिजनमुळे हे काम रखडले आहे.
अन्न-औषध प्रशासनाकडून नोटीस, मात्र परिस्थिती ‘जैसे थे’
मुंबई-पुण्याच्या उत्पादकांकडून लिक्विड मिळत नसल्याच्या स्थानिक पुरवठादारांच्या तक्रारीनंतर अन्न व औषध प्रशासनाने पुरवठादार कंपनीस नोटीस पाठवली होती; परंतु त्यांच्याकडे अगोदरच मागणी आणि त्यातच काही प्रमाणात वेगवेगळ्या भागातील राजकीय दबाव असल्याचे सांगण्यात येत असून, त्यामुळे कंपन्याही प्रतिसाद देत नाहीत. किमान नाशिकमध्ये काही कारखानदारांना लागणारा लिक्विड आॅक्सिजन रुग्णालयांकडे पुरवल्यास अनेकांचे प्राण वाचू शकतील, याबाबत शासकीय यंत्रणांनी अन्न व औषध प्रशासनाला कळवले आहे.

Web Title: Oxygen scarcity due to lack of liquid supply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.