धुळ्याच्या असहकार्यामुळे मालेगावी ऑक्सिजन पुरवठा विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 01:15 AM2021-04-12T01:15:40+5:302021-04-12T01:16:04+5:30

मालेगावला  धुळे येथून ऑक्सिजनचा सुरळीत पुरवठा सुरू होता परंतु धुळ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी धुळे आणि नंदुरबारसाठी ऑक्सिजनची गरज असल्याने मालेगावला ऑक्सिजन पुरवठ्यास नकार दिल्याने मालेगावची ऑक्सिजन पुरवठ्याची व्यवस्था विस्कळीत झाल्याचे सामान्य रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. किशोर डांगे यांनी सांगितले.

Oxygen supply disrupted in Malegaon due to non-cooperation of Dhule | धुळ्याच्या असहकार्यामुळे मालेगावी ऑक्सिजन पुरवठा विस्कळीत

मालेगावी शासकीय विश्रामगृहात खासगी डॉक्टरांसमवेत  आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना कृषिमंत्री दादा भुसे. समवेत अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम, प्रांत विजयानंद शर्मा, डॉ. किशोर डांगे, मनपा उपायुक्त नितीन कापडणीस, मनोहर बच्छाव आदी.

googlenewsNext
ठळक मुद्देडाॅ. डांगे यांची स्पष्टोक्ती : नाशिकहून ऑक्सिजन पोहचण्यास विलंब

मालेगाव : मालेगावला  धुळे येथून ऑक्सिजनचा सुरळीत पुरवठा सुरू होता परंतु धुळ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी धुळे आणि नंदुरबारसाठी ऑक्सिजनची गरज असल्याने मालेगावला ऑक्सिजन पुरवठ्यास नकार दिल्याने मालेगावची ऑक्सिजन पुरवठ्याची व्यवस्था विस्कळीत झाल्याचे सामान्य रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. किशोर डांगे यांनी सांगितले.
याबाबत डॉ. डांगे यांनी नाशिकला जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली असता त्यांनी नाशिक येथून मालेगावला ऑक्सिजन पुरवठ्याची व्यवस्था करू, असे सांगितले. 
धुळे येथून ऑक्सिजन मिळत नसल्याने पुरवठा विस्कळीत झाला असून तुटवडा जाणवत आहे. नाशिक येथून ऑक्सिजन मिळण्यास पाच तास लागतात. धुळे कमी अंतरावर असल्याने वेळ वाचतो. यामुळे  असुविधा 
निर्माण झाली असून धुळे येथून ऑक्सिजन मिळण्याची व्यवस्था 
व्हावी, अशी मागणी डॉ डांगे यांनी केली आहे.
रिकामी सिलिंडर्स कमी आहेत. नाशिकचा वितरक वाहतूक सेवा व मनुष्यबळ देत नाही.  धुळे येथून शासनाने मालेगावसाठी  पुरेशा ऑक्सिजन सिलिंडर्सची व्यवस्था करावी, अशी मागणी डॉ. किशोर डांगे यांनी केली आहे.
ट्रकने करावी लागते सिलिंडरची वाहतूक
धुळेतील वितरकाशी सहा महिन्यांपूर्वी करार झाला होता त्याच्याकडून चोवीस तास सेवा मिळत होती. आता नाशिकहून ट्रकने ऑक्सिजन सिलिंडर्स आणावे लागतात. सिलिंडर्सची संख्या २४० इतकी आहे परंतु रोज ३०० ऑक्सिजन सिलिंडर्सची गरज आहे. याशिवाय २०० सिलिंडर्सची आणखी गरज आहे.

Web Title: Oxygen supply disrupted in Malegaon due to non-cooperation of Dhule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.