मालेगावी मागणीपेक्षा ऑक्सिजनचा पुरवठा कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:15 AM2021-04-23T04:15:30+5:302021-04-23T04:15:30+5:30
मालेगाव : शहरातील खासगी व शासकीय कोरोना सेंटरमध्ये ऑक्सिजनचा मागणीपेक्षा पुरवठा कमी होत असल्याने ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. शासनाने ...
मालेगाव : शहरातील खासगी व शासकीय कोरोना सेंटरमध्ये ऑक्सिजनचा मागणीपेक्षा पुरवठा कमी होत असल्याने ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. शासनाने पुरेसा ऑक्सिजन व रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा पुरेशा प्रमाणात करावा, अशी मागणी मालेगावमध्यचे आमदार मौलाना मुफ्ती मो. इस्माईल यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. नाशिक येथील घटनेनंतर मौलाना मुफ्ती मो. इस्माईल यांनी नाशिकच्या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली अर्पण केली. यानंतर मालेगाव शहरातील ऑक्सिजन सिलिंडरबाबत बोलताना माैलाना मुफ्ती मोहंमद इस्माईल म्हणाले की, कोरोनाची पहिली लाट आल्यानंतर राज्य शासनाने उपाययोजनांवर भर दिला पाहिजे होता. मात्र, अजूनही आरोग्य सेवेत पुरेशा सोय सुविधा नाहीत. शहरातील खासगी रुग्णालय, सामान्य रुग्णालय, सहारा कोविड सेंटर, हज हाऊस व दिलावर सभागृह या ठिकाणी मालेगाव शहराऐवजी बाहेरगावचे रूग्ण अधिक प्रमाणात आहेत.
-----------------------
आरोग्य खात्यावर ताण
शहरातील सर्व खासगी रुग्णालयातील खाटा भरल्या आहेत. ऑक्सिजनची मागणी वाढली आहे. मागणीपेक्षा पुरवठा कमी होत असल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांवर याचा ताण जाणवत आहे. रेमडेसिविर इंजेक्शनचाही तुटवडा निर्माण झाला आहे. नाशिकसारख्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून शासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. येथील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कामकाज कौतुकास्पद आहे. संकट काळात आम्ही जनतेसोबत असल्याचेही आमदार मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माईल यांनी सांगितले.