ऑक्सिजन पुरवठ्याचा मुंबई नव्हे नाशिक पटॅर्न!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:14 AM2021-05-16T04:14:27+5:302021-05-16T04:14:27+5:30

नाशिक : शहरातील खासगी रुग्णालयात आक्सिजन पुरवठा संपल्याने गंभीर रुग्णांना अन्य रुग्णालयात स्थलांतरित करण्याचा जीवघेणा प्रसंग या शहराने अनुभवला ...

Oxygen supply Mumbai not Nashik pattern! | ऑक्सिजन पुरवठ्याचा मुंबई नव्हे नाशिक पटॅर्न!

ऑक्सिजन पुरवठ्याचा मुंबई नव्हे नाशिक पटॅर्न!

Next

नाशिक : शहरातील खासगी रुग्णालयात आक्सिजन पुरवठा संपल्याने गंभीर रुग्णांना अन्य रुग्णालयात स्थलांतरित करण्याचा जीवघेणा प्रसंग या शहराने अनुभवला आणि रुग्ण अनेक रुग्णांचे यामुळे हालही झाले. त्यानंतर मुंबई पॅटर्नचा गवगवा होत असताना नाशिकमध्ये मग शासकीय यंत्रणांनी एकत्र येऊन ऑक्सिजन पुरवठ्याचा वेगळाच पॅटर्न राबवला. कोणत्याही रुग्णालयाचा कोणीही ठरलेला पुरवठादार असो, परंतु त्याच्याकडून नाही तर ज्याच्याकडे साठा उपलब्ध असेल त्यांच्याकडून थेट ऑक्सिजन घेण्याची मुभा दिली आणि त्यामुळे अवलंबित्व संपले आणि सहज ऑक्सिजन पुरवठा झाला.

अर्थात हे नियोजन काहीसे विलंबाने झाले. हेच नियोजन अगोदर झाले असते तर अनेक ठिकाणी रुग्णांची अकारण हेळसांड झाली नसती, अशीही भावना व्यक्त केली जात आहे.

कोराेनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट अधिक तीव्र हाेती. मार्च महिन्यानंतर महापालिकेच्या बिटको आणि डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन बेड मिळणे कठीण झाले होते. रुग्णवाहिकेत फिरून आणि ऑक्सिजन बेड न मिळाल्याने अनेक रुग्णांचे मृत्यूदेखील झाले. तर काही वेळा रुग्णालयातील ऑक्सिजन पुरवठा संपल्याने अन्य रुग्णांच्या नातेवाईकांना आता सात ते आठ तास किंवा दोन तास पुरेल इतकाच ऑक्सिजन शिल्लक आहे. त्यामुळे रुग्णाला अन्य रुग्णालयात स्थलांतरीत करा असे समर प्रसंग उद्भवले आहे. मुळातच पुरवठा अपुरा होता. त्यातच पनवेल, रायगड किंवा पुणे येथील ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पावर टँकर चोवीस तास थांबल्यावर टँकर भरून मिळत होते. या पार्श्वभूमीवर मुंबई पॅटर्नचा गवगवा झाल्यानंतर नाशिकमध्ये नियोजन करण्यात आले. अर्थात हे नियोजन मुंबईपेक्षा पूर्णत: वेगळे होते.

नाशिकमध्ये रुग्णालय आणि पुरवठादारांचा व्हॉट्सॲप ग्रुप तयार करण्यात आला. केाणतेही रुग्णालय एखाद्या विशिष्ट पुरवठादार कंपनीशी कंत्राट करून त्यांच्याकडूनच ऑक्सिजन पुरवठा करून घेत असले तरी ही अट काढून टाकण्यात आली. कोणतेही रुग्णालय कोणत्याही पुरवठदाराकडून ऑक्सिजन घेऊ शकेल असे स्पष्ट करण्यात आले. कोणत्या पुरवठादाराकडे आजमितीला किती ऑक्सिजन पुरवठा आहे, हे व्हॉट्सॲप ग्रुपवर स्पष्ट करण्यात आल्यानंतर ज्या रुग्णालयाला ऑक्सिजनची गरज आहे, ते नेहमीच्या पुरवठादारापलीकडे जाऊन ज्याच्याकडे साठा आहे त्याच्याकडून ऑक्सिजन घेऊ लागले. त्यामुळे त्याचा अखेरच्या टप्प्यात उपयोग करण्यात आला आहे.

इन्फो...

मुंबईचा पॅटर्न असा आहे...

मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी राबवलेला पॅटर्न चर्चेत ठरला. न्यायालयानेही तो उचलून धरला. यात त्यांनी वाॅर्डनिहाय रुग्णालयांनी संपर्क अधिकारी नियुक्त केले. रुग्णालयातील साठ्याची वास्तव माहिती ते महापालिकेला देत. याशिवाय व्हॉट्सॲप ग्रुपवरदेखील साठ्याची सद्य स्थिती नोंदवत होते. तसेच वेबसाईटवरील डॅश बोर्डही अद्ययावत केले जात होते आणि महापालिकेच्या माध्यमातून पुरवठा करून वेगवेगळ्या ठिकाणाहून ऑक्सिजन उपलब्ध करून दिला जात होता.

इन्फेा..

नाशिकमध्ये काय घडले...

रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवठ्यासाठी जिल्हा प्रशासनाने समन्वय साधला. ऑक्सिजन हा विषय अन्न आणि औषध प्रशासनाच्या अखत्यारीत येत असल्याने जिल्हाधिकारी कार्यालय आणि महापालिका यांनी एकत्रित समन्वय साधला. सिन्नर तालुक्यात ऑक्सिजन पुरवठादार असेल तर तेथील तहसीलदारांना समन्वय साधून जिल्ह्यातील कोणत्याही रुग्णालयाला ऑक्सिजन हवा असल्यास तत्काळ देण्याची कार्यवाही करण्यात यावी अशीही व्यवस्था करण्यात आली.

इन्फो...

हेल्पलाईनचीही सेाय..

महापालिकेने शहरातील रुग्णालयांसाठी एक हेल्पलाईन तयार केली. रुग्णालयांनी ऑक्सिजनची मागणी पुरवठादाराकडे केल्यानंतर १६ तासात ऑक्सिजन साठा मिळाला नाही तर महापालिकेच्या हेल्पलाईनवर कळवावे असे आवाहन करण्यात आले हेाते. मात्र, त्याचबरोबर प्रत्यक्ष समन्वयाचादेखील फायदा झाला, असे महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत शेटे यांनी सांगितले.

इन्फो...

८२०९

शहरातील एकूण कोविड बेड

३२४४

जनरल बेडस

३७७५

ऑक्सिजन बेडस

१०९३

आयसीयू बेडस

८४८

व्हेंटीलेटर्स बेड

Web Title: Oxygen supply Mumbai not Nashik pattern!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.