मालेगाव सामान्य रुग्णालयाला ऑक्सिजन टँक उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:15 AM2021-04-27T04:15:59+5:302021-04-27T04:15:59+5:30

सामान्य रुग्णालयास प्राप्त झालेला हा ऑक्सिजन टँक कार्यान्वित होण्यास १२ ते १५ दिवस लागणार आहेत. ...

Oxygen tank available to Malegaon General Hospital | मालेगाव सामान्य रुग्णालयाला ऑक्सिजन टँक उपलब्ध

मालेगाव सामान्य रुग्णालयाला ऑक्सिजन टँक उपलब्ध

Next

सामान्य रुग्णालयास प्राप्त झालेला हा ऑक्सिजन टँक कार्यान्वित होण्यास १२ ते १५ दिवस लागणार आहेत. लिक्विड ऑक्सिजनद्वारे या टँकचे रिफील करण्यात येणार आहे. या ऑक्सिजन टँकच्या माध्यमातून सामान्य रुग्णालयातील २०० खाटांना ऑक्सिजन पाइपलाइनव्दारे जोडणी करण्यात येणार आहे. १०० बेडसाठी किमान ६ ते १५ दिवस पुरेल इतक्या क्षमतेचा हा ऑक्सिजन टँक असल्याने यामुळे वेळेसह वाहतूक व मनुष्यबळाची मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे. याप्रसंगी सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.किशोर डांगे, अतिरिक्त शल्यचिकित्सक डॉ.हितेश महाले, डॉ.शिलवंत, डॉ.महेंद्र पाटील, डॉ.बरडे, रामा मिस्तरी, विनोद वाघ आदी उपस्थित होते.

इन्फो

आरोग्यमंत्र्यांनी दिले होते आश्वासन

सामान्य रुग्णालयास पूर्वी ६ के.एल. क्षमतेचा ऑक्सिजन टँक मंजूर करण्यात आला होता. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी येथील सामान्य रुग्णालयाला दिलेल्या भेटीत येथील वाढती रुग्णसंख्या व गरजेप्रमाणे लागणारा ऑक्सिजन यामधील तफावत लक्षात घेऊन ६ के.एल. ऐवजी २० के.एल. क्षमतेचा ऑक्सिजन टँक बसविण्याचे आश्वासन दिले होते. त्या अनुषंगाने कृषी मंत्री दादा भुसे यांच्यासह आमदार मौलाना मुफ्ती यांनी २० के.एल. चा ऑक्सिजन टँक लवकरात लवकर मिळावा यासाठी तांत्रिक व प्रशासकीय मंजुरीसाठी केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश मिळाले आहे.

फोटो - २६ मालेगाव टँकर

मालेगाव येथील सामान्य रुग्णालयाला उपलब्ध झालेला टँकर. समवेत कृषिमंत्री दादा भुसे यांच्यासह डॉ किशोर डांगे, डॉ. हितेश महाले आदींसह पदाधिकारी.

===Photopath===

260421\26nsk_45_26042021_13.jpg

===Caption===

फोटो - २६ मालेगाव टँकर मालेगाव येथील सामान्य रुग्णालयाला उपलब्ध झालेला टँकर. समवेत कृषिमंत्री दादा भुसे यांच्यासह डॉ किशोर डांगे, डॉ हितेश महाले आदींसह पदाधिकारी

Web Title: Oxygen tank available to Malegaon General Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.