Nashik Oxygen Leak: नाशिक पालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजन टाकीला गळती, काही रुग्ण दगावल्याची भीती
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2021 01:38 PM2021-04-21T13:38:24+5:302021-04-21T14:13:35+5:30
Oxygen Tank Leak : गळती बंद करण्यासाठी तांत्रिक पथकाबरोबरच अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करीत आहेत.
नाशिक : महापालिकेच्या जुने नाशिक भागातील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयाच्या ऑक्सिजन टाकीला आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास गळती लागली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन वाया जात आहे. गळती बंद करण्यासाठी तांत्रिक पथकाबरोबरच अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. दरम्यान, काही रुग्ण ऑक्सिजन अभावी दगावल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
महापालिकेचे हे संपूर्ण कोविड रुग्णालय असून सुमारे दीडशे रुग्ण येथे दाखल आहेत. अनेक रुग्ण ऑक्सिजन बेड आणि व्हेंटिलेटरवर आहेत. ऑक्सिजन टाकीला गळती लागल्याने अशा रुग्णांचा जीव धोक्यात आला असून त्यांना अन्य ऑक्सिजन असलेल्या रुग्णालयात स्थलांतरीत करण्यात येत आहे. नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातून तातडीने 15 जम्बो ऑक्सिजन सिलिंडर रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी झाकीर हुसेन रूग्णालयात पाठविण्यात येत आहे.
नाशिक महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयाच्या ऑक्सिजन टाकीला मोठी गळतीhttps://t.co/CbvSFUjpi9#Nashikpic.twitter.com/1dZchKrOX4
— Lokmat (@MiLOKMAT) April 21, 2021
नाशिक पालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टँक लीक झाल्याने खळबळ pic.twitter.com/A6rIe2cP0q
— Lokmat (@MiLOKMAT) April 21, 2021
नाशिक : डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजन टाकीला गळतीनंतर दीड-दोन तासांत लिक्विड ऑक्सिजनचा टँकर उपलब्ध https://t.co/CbvSFUjpi9pic.twitter.com/jAcmjwXE5m
— Lokmat (@MiLOKMAT) April 21, 2021