झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टाकी दुरुस्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:15 AM2021-04-27T04:15:41+5:302021-04-27T04:15:41+5:30

महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात गेल्या बुधवारी (दि.२१) ऑक्सिजन टाकीतून गळती झाल्याने मोठी दुर्घटना घडली होती. गळतीमुळे ऑक्सिजनच्या अपुऱ्या ...

Oxygen tank repair at Zakir Hussain Hospital | झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टाकी दुरुस्ती

झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टाकी दुरुस्ती

Next

महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात गेल्या बुधवारी (दि.२१) ऑक्सिजन टाकीतून गळती झाल्याने मोठी दुर्घटना घडली होती. गळतीमुळे ऑक्सिजनच्या अपुऱ्या दाबाने २४ रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर महापालिकेने ऑक्सिजन टाकीच्या दुरुस्तीचे काम करण्यास ठेकेदार कंपनीला सांगण्यात आले हेाते. आयुक्त कैलास जाधव यांनी संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांची कडक हजेरी घेतल्यानंतर रविवारपासून (दि.२५) टाकीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. टाकी दुरुस्त करताना रुग्णांचा ऑक्सिजन पुरवठा सुरळीत रहावा यासाठी अगोदरच काळजी घेऊन एक केएलच्या एकूण दोन टाक्या बसविण्यात आल्या होत्या. त्यानंतर गॅसकीट आणि पाईप बदलण्याचे काम करण्यात आले आहे. त्यानंतर चाचणी सुरू करण्यात आली आहे. परंतु चोवीस तास पर्यायी टाक्या कायम ठेवूनच ऑक्सिजन टाक्या पुरविण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या कोविड सेलचे प्रमुख डॉ. आवेश पलोड यांनी दिली.

Web Title: Oxygen tank repair at Zakir Hussain Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.