ओझर @ 7.8; थंडीचा कडाका कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2019 12:07 AM2019-12-30T00:07:28+5:302019-12-30T00:08:03+5:30
निफाड तालुक्यात थंडीने या हंगामातील नीचांक गाठला. ओझर येथील एच.ए.एल. कंट्रोल टॉवर येथे यावर्षीची सर्वात कमी ७.८ अंश तापमानाची नोंद झाली आहे. तालुक्यातील द्राक्षपंढरी म्हणून ओळखल्या जाणाºया ओझर, पिंपळगाव, उगाव, शिवडी, सोनेवाडी भागात द्राक्षबागांवर दवबिंदंूची बारीक बर्फाची झालर तयार झाली होती.
ओझर : निफाड तालुक्यात थंडीने या हंगामातील नीचांक गाठला. ओझर येथील एच.ए.एल. कंट्रोल टॉवर येथे यावर्षीची सर्वात कमी ७.८ अंश तापमानाची नोंद झाली आहे. तालुक्यातील द्राक्षपंढरी म्हणून ओळखल्या जाणाºया ओझर, पिंपळगाव, उगाव, शिवडी, सोनेवाडी भागात द्राक्षबागांवर दवबिंदंूची बारीक बर्फाची झालर तयार झाली होती.
कडाक्याच्या थंडीने द्राक्षमालाची फुगवण थांबली आहे, तर पारा घसरल्याने परिपक्व द्राक्षमणी तडकून नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान, सदरचे तापमान हे कोणत्याच पिकाला चांगले नाही. या तापमानामुळे द्राक्षबागेत केवळ द्राक्षांनाच नव्हे तर द्राक्षवेलीतील पेशींनाही जखमा होण्याचा धोका आहे. एकीकडे अवकाळी पावसाच्या परिस्थितीने संकटात सापडलेल्या बळीराजा समोरील संकटांची मालिका थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. टंचाईवर मात करणाºया शेतकऱ्यांच्या संकटात आता वाढत्या थंडीने भर टाकली आहे. हुडहुडी भरणाºया थंडीचा बहरलेल्या द्राक्षबागांना झटका बसू लागला आहे.
तापमानाचा पारा बराच खाली घसरू लागल्याने बागेतील द्राक्षमणी तडकू लागतानाच द्राक्षांच्या घडांवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याच्या भीतीने द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंतित आहेत. नाशिक जिल्ह्यात दिवसागणिक तापमानाचा पारा अधिकाधिक खाली येत चालल्याने जनजीवन विस्कळीत होतानाच या कडाक्याच्या थंडीनं प्रताप दाखवायला सुरूवात केली आहे. विशेषत: सध्याच्या कडाक्याच्या थंडीमुळे ओझर परिसरातील द्राक्षबागांवर विपरीत परिणाम करण्यास सुरु वात केली आहे. निफाड तालुक्यात बुधवारपासून तापमान अधिकच खाली घसरल्याने द्राक्ष उत्पादक शेतकºयांसमोरील चिंता अधिकच वाढली आहे.