ओझरला व्यापारी असोसिएशनच्या साप्ताहिक सुटी जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2020 04:25 AM2020-12-03T04:25:35+5:302020-12-03T04:25:35+5:30
ओझर : येथील ग्रामपालिका प्रशासनाच्यावतीने कोरोना आळा बसावा यासाठी व्यापाऱ्यांच्या सर्वानुमते महिन्यातील दर सोमवारी मटन मार्केट व सलून व्यावसायिक ...
ओझर : येथील ग्रामपालिका प्रशासनाच्यावतीने कोरोना आळा बसावा यासाठी व्यापाऱ्यांच्या सर्वानुमते महिन्यातील दर सोमवारी मटन मार्केट व सलून व्यावसायिक आपला व्यवसाय पूर्णपणे बंद ठेवणार असल्याचे जाहीर करण्यात आले. शनिवारी गिरणी व्यावसायिक यानी बंद ठेवण्याचे जाहीर केल्यानंतर इतर सर्व व्यापाऱ्यांनी सर्वानुमते बुधवार बंद ठेवण्याचे जाहीर केले. त्यामुळे ओझरमध्ये सर्वनियमांचे काटेकोरपणे पालन केले जातील व व्यावसायिक आपापले दुकाने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवतील, असा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी दर बुधवारी ओझर पूर्णपणे बंद, असा निर्णय घेतला होता. परंतु या निर्णयाला मटन मार्केट, सलून मार्केट तसेच काही व्यापाऱ्यांनी विरोध दर्शविल्याने १ डिसेंबर रोजी प्रशासनाने सर्व व्यापारी असोसिएशनच्या पदाधिकारी व २० डिसेंबर रोजी चंपाषष्ठीनिमित्त दरवर्षी भरणाऱ्या खंडेराव महाराज यात्रा उत्सव संदर्भात मिटिंग बोलाविण्यात आली होती. यावेळी यात्रोत्सवाचा निर्णय पुढील काळात पुन्हा बैठक घेऊन घेतला जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले. त्याचप्रमाणे यात्रा उत्सव संदर्भात येत्या काळात पुन्हा एक मिटिंग घेऊन यात्रोत्सव करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल, असे ग्रामपालिका प्रशासनच्या वतीने सांगण्यात आले. यावेळी प्रशासक कैलास गादड, ग्रामसेवक डी. बी देवकर, जिल्हा परिषद सदस्य यतिन कदम, सागर शेजवळ, अमित हरकरे, पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, कापड असोसिएशनचे पदाधिकारी, अरुण पवार, तुषार मणियार, हरी गिल, प्रसाद येवले, रामानंद बंगेरा, सर्कल अधिकारी प्रशांत तांबे, तलाठी उल्हास देशमुख, धनंजय पगार, युवराज शेळके, यात्रा कमिटी सदस्य, नागरिक उपस्थित होते.