ओझर : दारिद्र्यरेषेखालील असणाºयांसाठीचे लाभ आता सर्वांना ‘माझी कन्या भाग्यश्री’ योजनेत सुधारणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 11:50 PM2018-01-16T23:50:27+5:302018-01-17T00:20:46+5:30

ओझर : शासनाच्या महिला व बाल कल्याण विभागातर्फेपूर्वी फक्त दारिद्र्यरेषेखाली असणाºयांना मिळत असलेले लाभ आता सर्वांना मिळणार आहे.

Ozar: Benefits of those areas below poverty line are now improved to all 'my daughter Bhagyashree' | ओझर : दारिद्र्यरेषेखालील असणाºयांसाठीचे लाभ आता सर्वांना ‘माझी कन्या भाग्यश्री’ योजनेत सुधारणा

ओझर : दारिद्र्यरेषेखालील असणाºयांसाठीचे लाभ आता सर्वांना ‘माझी कन्या भाग्यश्री’ योजनेत सुधारणा

Next
ठळक मुद्देराज्य सरकार एक लाख रुपये जमा करणारसोन्याचे नाणे भेट देण्यात येणार

ओझर : शासनाच्या महिला व बाल कल्याण विभागातर्फेपूर्वी फक्त दारिद्र्यरेषेखाली असणाºयांना मिळत असलेले लाभ आता सर्वांना मिळणार असून, सरकारने त्याची अट शिथिल करत दि. १ एप्रिल २०१६ नंतर जन्मलेल्या मुलींच्या खात्यावर एक लाख रुपये जमा करण्याचे निश्चित केले आहे.  समाजात मुलींचा जन्मदर वाढण्यासाठी राज्य सरकार विविध उपक्रम राबवित असून, याच उपक्रमाचा एक भाग म्हणून शासनाच्या महिला व बाल कल्याण विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेली ‘माझी कन्या भाग्यश्री’ योजनेत सुधारणा करून दि. १ एप्रिल २०१६ नंतर जन्माला आलेली मुलगी १८ वर्षांची झाल्यानंतर राज्य सरकार तिच्या खात्यावर एक लाख रुपये जमा करणार आहे. ‘माझी कन्या भाग्यश्री’ या योजनेचा प्रारंभीच्या काळात फक्त दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांनाच लाभ घेता येत होता. राज्य सरकारच्या महिला आणि बाल कल्याण विभागाने यात आमूलाग्र बदल करीत आता सुधारित आदेशानुसार याचा लाभ कोणत्याही सर्वसामान्य कुटुंबाला घेता येणार आहे. या योजनेंतर्गत एखाद्या कुटुंबात दि. १ एप्रिल २०१६ नंतर एका कन्येचा जन्म झाला तर ती कन्या १८ वर्षांची झाल्यावर राज्य शासन तिच्या खात्यावर एक लाख रुपये जमा करणार आहे. याव्यतिरिक्त ती कन्या १८ वर्षांची होईपर्यंत विविध टप्प्यांवर शासनाच्या मुलींसाठी असणाºया योजनांचा लाभदेखील तिला मिळणार आहे. मुलीचा जन्म झाल्यानंतर तिचा जन्मोत्सव साजरा करण्यासाठी कुटुंबीयांना पाच हजार रुपयेदेखील मिळणार आहेत. त्याचप्रमाणे मुलीच्या आजी- आजोबांना पाच हजार रुपये किमतीचे सोन्याचे नाणे भेट देण्यात येणार आहे. ती मुलगी पाच वर्षांची होईपर्यंत प्रत्येक वर्षी तिच्या पोषणासाठी दोन हजार रुपयेदेखील मिळणार आहेत. पाच वर्षांची मिळून होणारी रक्कम दहा हजार इतकी असून, मुलगी शाळेत गेल्यानंतर पहिली ते पाचवीपर्यंतच्या शिक्षणासाठी प्रतिवर्षी अडीच हजार रुपये शासन देणार आहे. या पाच वर्षांत एकूण रक्कम साडेबारा हजार रुपये होणार असून, त्यापुढील शिक्षणासाठी म्हणजेच सहावी ते बारावीपर्यंतच्या शिक्षणासाठी प्रतिवर्षी तीन हजार शासन देणार असून, ही रक्कम २१ हजार इतकी होणार आहे. याच दरम्यान मुलगी १८ वर्षांची झाल्यानंतर तिला एकरकमी एक लाख रुपये शासन तिच्या नावावर करणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्य सरकारने कुटुंबनियोजन शस्त्रक्रियेची महत्त्वपूर्ण अट घातली आहे. राज्य शासनाच्या या योजनेची माहिती जिल्ह्यातील प्रत्येक तालुका बालविकास प्रकल्प अधिकाºयाकडे उपलब्ध आहे. योजना १ एप्रिल २०१६ पासून लागू करण्यात आली असून, संबंधित कुटुंबात दोन मुली असतील तर त्यातील प्रत्येक मुलीला या योजनेच्या अर्ध्या रकमेचा लाभ मिळणार आहे.

Web Title: Ozar: Benefits of those areas below poverty line are now improved to all 'my daughter Bhagyashree'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :MONEYपैसा