ओझर एचएएल कारखाना पूर्ववत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2020 09:02 PM2020-04-22T21:02:02+5:302020-04-23T00:20:19+5:30
ओझर टानशिप : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी लॉकडाउनमध्ये बंद असलेला एचएएल कारखाना सोमवारपासून (दि.२०) सुरू झाला आहे.
ओझर टानशिप : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी लॉकडाउनमध्ये बंद असलेला एचएएल कारखाना सोमवारपासून (दि.२०) सुरू झाला आहे. मात्र ओझर टाउनशिपमध्ये राहणाऱ्या कामगार व अधिकारी यांनाच
कामावर येण्यास व्यवस्थापनाने परवानगी दिली असल्याने जवळपास १२५० ते १३०० कामगार व अधिकारी रोज कामावर उपस्थित राहत आहे. दोन शिफ्टमध्ये काम केले जात आहे . शासनाच्या आदेशानुसार दि. २३ मार्च ते १४ एप्रिलपर्यंत कारखान्यातील काम बंद ठेवून कामगार व अधिकारी यांना सुटी देण्यात आली होती. त्यानंतर दि. १५ एप्रिल ते ३ मेपर्यंत लॉकडाउनचा कालावधी वाढविण्यात आला. दरम्यान दि. २० एप्रिलपासून परिस्थिती बघून लॉकडाउनमध्ये शिथिलता आणल्यामुळे कारखाना सुरू करण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला. त्यानुसार एचएएल कारखाना सोमवारपासून सुरू झाला आहे. एचएएल कामगार व अधिकारी ओझर, ओझर टाउनशिप, पिंपळगाव, चांदवड, जानोरी, मोहाडी, नाशिक, सिन्नर आदी ठिकाणी वास्तव्यास आहेत. यापैकी काही ठिकाणी रेडझोन आहे.
-----
दोन शिफ्टमध्ये काम
दक्षता म्हणून ओझर टाउनशिप वसाहतीत राहणाºया अधिकारी व कामगार यांनाच कामावर येण्याची परवानगी व्यवस्थापनाने दिली आहे. ही संख्या १४५४ इतकी आहे. त्यामुळे कारखान्यात १२५० ते १३०० कामगार व अधिकारी उपस्थित असतात. कामगारांची कामाच्या ठिकाणी गर्दी होणार नाही यासाठी एकमेकांत ठरावीक अंतर ठेवून सकाळी ७ ते १२ तसेच दुपारी १ ते ६ अशा दोन शिफ्टमध्ये
दि. ३ मेपर्यंत काम केले जाणार आहे.