ओझरला नवीन ८५ बाधित रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 00:21 IST2021-04-24T21:09:28+5:302021-04-25T00:21:04+5:30
ओझरटाऊनशिप : ओझर येथे कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसागणिक भरच पडत असून शनिवारी (दि.२४) ८५ रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले. दरम्यान, ओझरला जनता कर्फ्यू सुरू आहे तर एचएएल कारखानाही चार दिवसापासून बंद आहे तरीही रुग्णसंख्या कमी झालेली नाही.

ओझरला नवीन ८५ बाधित रुग्ण
ठळक मुद्देओझरसह परिसरातील कोरोनाबाधित रुग्णसंख्या आता ३,७१० झाली
ओझरटाऊनशिप : ओझर येथे कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसागणिक भरच पडत असून शनिवारी (दि.२४) ८५ रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले. दरम्यान, ओझरला जनता कर्फ्यू सुरू आहे तर एचएएल कारखानाही चार दिवसापासून बंद आहे तरीही रुग्णसंख्या कमी झालेली नाही.
ओझरसह परिसरातील कोरोनाबाधित रुग्णसंख्या आता ३,७१० झाली आहे. त्यापैकी ९० कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण २,७४९ रुग्ण बरे झाले असून, ८७१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ७६७ रुग्ण घरीच क्वारंटाईन होऊन उपचार घेत आहेत. परिसरातील एकूण कंटेन्मेंट झोनसंख्या १८३६ झाली असून, ॲक्टिव्ह झोन ८७१ असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.