ओझरला जनावरांसह दहा लाखांचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:12 AM2021-07-20T04:12:10+5:302021-07-20T04:12:10+5:30
पालखेड उजव्या कालव्यालगत लतिफ सुलतान कुरेशी याच्या पोल्ट्री फार्मच्या आवारात पत्र्याच्या शेडमध्ये जनावरे कत्तलीसाठी डांबून ठेवल्याची माहिती पोलिसांना ...
पालखेड उजव्या कालव्यालगत लतिफ सुलतान कुरेशी याच्या पोल्ट्री फार्मच्या आवारात पत्र्याच्या शेडमध्ये जनावरे कत्तलीसाठी डांबून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी या ठिकाणी जाऊन तपासणी केली असताना, पिकअप गाडीमध्येदेखील जनावरे डांबून ठेवल्याचे दिसून आले. त्यानुसार पोलिसांनी पिकअपचालकाला गाडीतील जनावरे आणि पत्र्याच्या शेडमधील जनावरे याबाबत विचारणा केली व पत्र्याच्या शेडमध्ये असलेल्या जनावरांची पाहणी केली. पोलिसांनी कारवाई करत जनावरांसह चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सलीम इलियास मन्सुरी, जुबेर लतिफ कुरेशी, नदीम फारूक कुरेशी यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली. यावेळी २५ च्या आसपास जनावरे व पिकअप असा एकूण तीन लाख ४१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. दुसऱ्या घटनेत ओझर-सुकेणे रोडवर ओझर शिवारात असलेल्या म्हशीच्या गोठ्याच्या बाजूला जनावरे पत्र्याच्या शेडमध्ये डांबून ठेवल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकला असता १३० जनावरे असा एकूण ६ लाख ६२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. याप्रकरणी जुबेर हारुण कुरेशी, व विजय हरिभाऊ जाधव यांच्या विरुद्ध कारवाई केली आहे. या दोन्ही घटनांचा ओझर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.