ओझरला जपानुष्ठाण सोहळ्याची सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 02:37 PM2018-03-27T14:37:19+5:302018-03-27T14:37:19+5:30

Ozar is set to celebrate the Japanese festival | ओझरला जपानुष्ठाण सोहळ्याची सांगता

ओझरला जपानुष्ठाण सोहळ्याची सांगता

Next

ओझरटाऊनशिप : येथील जगदगुरु जनार्दन स्वामी मौनिगरीजी महाराज आश्रमात गेल्या आठ दिवसापासून मौनव्रतात सुरू असलेल्या जपानुष्ठान सोहळ्याची सांगता ‘जय बाबाजी’, ‘जय बाणेश्वर’ अशा प्रचंड जय घोषात संपन्न झाली. महामंडलेश्वर समर्थ सद्गुरू स्वामी शांतिगिरी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत ओझर येथील आश्रमात जपानुष्ठान, यज्ञ, अखंड नंदादीप, हस्तलिखित जपसाधना , रोज पहाटे ब्रह्ममुहूर्तावर नित्यनियम विधी , आरती, प्रवचन ,सत्संग, एकनाथी भागवत वाचन, १०८ शिवलिंग तसेच १०८ गोमुख स्थापना ,श्री गणेश, श्री हनुमान मंदिर कलशारोहन सोहळा आदि भरगच्च कार्यक्रम झाले. जपानुष्ठानला बसणाऱ्या भाविकांनी आयुष्यभर व्यसनमुक्त आणि शाकाहारी राहण्याचा संकल्प केला.यावेळी साधकांना मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सांगतेनिमित्त ओझर परिसरातून सवाद्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत जपानुष्ठानास बसलेल्या साधकांसह कलशाधारी महिला,कुमारिका सहभागी झाल्या होत्या. सत्संग सोहळ्याप्रसंगी ब्रम्हचारी रामानंदी महाराज यांनी जपानुष्ठान आजच्या काळाची गरज असून अनेक प्रकारचे संस्कार जपानुष्ठानाच्या माध्यमातून केले जातात. मौनव्रतामूळे आत्मिक शक्ती वाढुन अध्यात्मिक ऊर्जा मिळते.जीवनात प्रत्येकाने सदगुरु करावे आणि त्यांच्या आदेशाचे पालन करावे. प्रत्येकाने वर्षातून एकतरी जपानुष्ठान करावे असेही यावेळी रामानंद महाराज यांनी सांगितले. यावेळी आठ दिवस केवळ हवेवर जपानुष्ठान करणाºया साधकास स्वामी शांतिगिरी महाराज यांनी तीर्थ देऊन त्यांच्या जपानुष्ठानाची सांगता केली. आठ दिवस केवळ पाणी आणि दुधावर जपानुष्ठान करणाºया साधकांच्याही व्रताची सांगता रामानंद महाराज यांच्या हस्ते तीर्थ देऊन करण्यात आली.

Web Title: Ozar is set to celebrate the Japanese festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक