ओझर टेक्स्टाइल मार्केटची ‘महाखरेदी ऑफर’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:18 AM2021-08-14T04:18:37+5:302021-08-14T04:18:37+5:30
आयोजन करण्यात आले आहे. आगामी नवरात्रोत्सव व दीपावलीसारख्या मोठ्या सणांच्या पार्श्वभूमीवर सर्व व्यापारी बांधवांसाठी त्याचप्रमाणे घरगुती स्वरूपात साडी विक्रीचा ...
आयोजन करण्यात आले आहे. आगामी नवरात्रोत्सव व दीपावलीसारख्या मोठ्या सणांच्या पार्श्वभूमीवर सर्व व्यापारी बांधवांसाठी त्याचप्रमाणे घरगुती स्वरूपात साडी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी ही मोठी व्यवसाय संधी ओझर टेक्स्टाइल मार्केटच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आली आहे.
सुरत, बंगलोर, जयपूर, महू, बनारस, बेळगाव, कोलकाता, मुंबई, मदुराई, मालेगाव, कोईमतूर, दिंडीगल या प्रमुख अशा भारतातील साडीनिर्मिती करणाऱ्या शहरांमधून खास दीपावलीनिमित्तचा फ्रेश स्टॉक असंख्य व्हरायटीजमध्ये येथे उपलब्ध करण्यात आला असून, तेथील पारंपरिक कलाकौशल्याने निर्मित साड्यांच्या अतिशय सुंदर व्हरायटीज व डिझाईन्स पाहायला मिळत असल्याने व्यापारी व व्यावसायिकांचा प्रतिसाद लाभत आहे. सुटिंग, शर्टिंग, रेडिमेड गारमेंट्स, सिंथेटिक व कॉटन ड्रेस मटेरिअल हे सुद्धा रेडी स्टॉक स्वरूपात ओझर होलसेल टेक्स्टाइल मार्केटमध्ये उपलब्ध असून, या ‘महाखरेदी ऑफर’मध्ये सहभागी होणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी डिस्काऊंटदेखील देण्यात येणार आहे. यासोबतच बऱ्याच ऑफर्स या ‘महाखरेदी ऑफर’मध्ये व्यापाऱ्यांना व साडी विक्रेते व्यावसायिकांना देण्यात येत आहे.
या वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे इतर व्यवसायांप्रमाणेच टेक्स्टाइल उद्योगावरही मोठा परिणाम झाला असून, यातून सावरण्यासाठी तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने शासनाने आखून दिलेले नियम व अटींचे काटेकोरपणे पालन ओझर टेक्स्टाइलमध्ये केले जात आहे. सॅनिटायझरचा वापर करणे, शरीराच्या तापमानाचे मापन करणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन इत्यादी नियमांचे पालन केले जात आहे. ओझरच्या द्राक्ष भवनाजवळील विठ्ठल कॉम्प्लेक्समध्ये ‘महाखरेदी ऑफर’साठी येणाऱ्या व्यापारी व व्यावसायिकांसाठी संपर्क क्रमांक देण्यात आलेले असून, अधिक माहितीसाठी संचालक प्रसाद व कैलास येवले यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.