ओझरला पावसाने झोडपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2019 06:21 PM2019-07-07T18:21:57+5:302019-07-07T18:22:15+5:30
ओझर : बहुप्रतिक्षति असलेल्या पावसाने जुलैच्या पिहल्या आठवड्याच्या सांगतेला झालेले आगमन बावीस तास सुरू होते.
ओझर : बहुप्रतिक्षति असलेल्या पावसाने जुलैच्या पिहल्या आठवड्याच्या सांगतेला झालेले आगमन बावीस तास सुरू होते.
शनिवारी रात्री सुरू झालेला पाऊस रविवारी दिवसभर पडत होता.त्यामुळे शेतकर्यांमध्ये समाधानाचे वातावरण झाले असून शेतकर्यांनी आपल्या शेतकामाला आता गती दिली आहे. व्यापारी पेठेत एकूण झालेले मंदीचे वातावरण पडलेल्या पावसाने आशादायी देऊन जाणारे आहे.बाणगंगा नदीला अजून पूर यायला बाकी असून.नदीची परिस्थिती अजून जैसे थेच आहे. पुढे पाऊस असाच पडत राहिल्यास वेळीच उपाययोजना करण्यासाठी ग्रामपंचयात प्रशासनाने नदीकाठच्या लोकांना सूचना देण्याच्या हालचाली गतिमान केल्या आहेत. बाणगंगा नदीला पूर यायला हवा जेणेकरून मळमट व घाण कचरा वाहून जाईल व नदी स्वच्छ होईल अशी अपेक्षा ओझरकर नागरिकांनी केली आहे.