ओझर शहर तीन दिवस बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2020 09:17 PM2020-05-15T21:17:57+5:302020-05-15T23:33:07+5:30
ओझर : येथे गावात पहिला कोरोनाबधित सापडल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहे . गुरु वारी (दि.१४) सायंकाळी बाधिताच्या घराजवळ ग्रामपालिका कर्मचारी यांनी जंतुनाशक फवारणी करून परिसर सील केला.
ओझर : येथे गावात पहिला कोरोनाबधित सापडल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहे . गुरु वारी (दि.१४) सायंकाळी बाधिताच्या घराजवळ ग्रामपालिका कर्मचारी यांनी जंतुनाशक फवारणी करून परिसर सील केला. आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांनी तेथे भेट देऊन कुटुंबातील व्यक्तींची नावे व माहिती घेतली. गावात तीन दिवस संपूर्णपणे लॉकडाउन राहणार असून, केवळ वैद्यकीय सेवा यांनाच परवानगी देण्यात आली आहे.
ओझर ग्रामपंचायतीकडून स्थानिक पातळीवर ६ मे पासून सम- विषम पद्धतीने गावातील सर्व दुकाने उघडण्याचा निर्णय घेण्यात आला, परंतु ओझर गावात कोरोनाचा शिरकाव झाल्याने ओझरकर नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने पुढील तीन दिवस खबरदारीचा उपाय म्हणून ओझरमध्ये ठिकठिकाणी भरणारा भाजीपाला बाजार, किराणा दुकान व इतर सर्व दुकाने (हॉस्पिटल व मेडिकल) वगळता पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय ग्रामपंचायतीकडून तातडीने घेण्यात आला, अशी माहिती ग्रामपालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
--------------
कोरोनामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण आहे, परंतु आरोग्य खात्याचे कर्मचारी जेव्हा आपल्याकडे येतात तेव्हा त्यांना योग्य सहकार्य करून खरी माहिती द्या. खोटी माहिती देणे आपल्या आरोग्यावर बेतू शकते त्यामुळे आपण निरोगी कसे राहाल यासाठी आम्ही माहिती घेतो म्हणजे वेळेआधी इलाज करून बरे करता येईल.
- डॉ. वैशाली कदम, वैद्यकीय अधिकारी, ओझर.