ओझरला कोरोना प्रतिबंधक बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:15 AM2021-04-22T04:15:39+5:302021-04-22T04:15:39+5:30
बैठकीत मार्गदर्शन करताना आमदार बनकर यांनी राज्य सरकार युद्धपातळीवर या महामारीविरोधात काम करीत असल्याचे सांगून सकारात्मक ऊर्जेतून माणूस ...
बैठकीत मार्गदर्शन करताना आमदार बनकर यांनी राज्य सरकार युद्धपातळीवर या महामारीविरोधात काम करीत असल्याचे सांगून सकारात्मक ऊर्जेतून माणूस जगला पाहिजे या भावनेने काम करा, असे आवाहन केले. माजी आमदार कदम यांनी प्राथमिक लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, असे सांगत शहरातील डाॅक्टरांनी समन्वय ठेवत नाशिक येथील तज्ज्ञ डाॅक्टरांशी संपर्क ठेवण्याचा सल्ला दिला. शरद आहेर यांनी कोविड सेंटर करायचे असेल तर दीक्षी रोडवरील आपले महाविद्यालय कोविड सेंटरसाठी देण्याचे घोषित केले. यावेळी तहसीलदार घोरपडे, प्रदीप अहिरे व प्रकाश महाले यांनी मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी सुनील बाफना, नितीन जाधव, विशाल भडके, नितीन काळे, डॉ. योगेश्वर चौधरी, आतिश शिंदे, चेतन कावळे, ओमकोचे चेअरमन विजय शिंदे, व्हा. चेअरमन अरुण पवार, धर्मेंद्र जाधव, मंडळ अधिकारी प्रशांत तांबे, तलाठी उल्हास देशमुख, नगरपरिषद कर्मचारी संतोष सोनवणे, प्रशांत पगार, भारत पगार, विनोद विधाते आदी उपस्थित होते.
फोटो - २१ ओझर १
ओझर येथे कोरोना आढावा बैठकीत बोलताना अनिल कदम. समवेत आमदार दिलीप बनकर, तहसीलदार शरद घोरपडे, राजेंद्र शिंदे, शरद आहेर, विजय शिंदे, अरुण पवार आदी.
===Photopath===
210421\21nsk_24_21042021_13.jpg
===Caption===
ओझर येथे कोरोना आढावा बैठकीत बोलताना अनिल कदम. समवेत आमदार दिलीप बनकर, तहसीलदार शरद घोरपडे, राजेंद्र शिंदे, शरद आहेर, विजय शिंदे, अरुण पवार आदी.