ओझरला तीन तास संततधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:39 AM2021-02-20T04:39:50+5:302021-02-20T04:39:50+5:30
निसर्गाचे चक्र बिघडल्याने द्राक्षबागांना मोठा फटका बसला असून, द्राक्ष उत्पादकांची चिंता वाढली आहे. निफाड तालुक्यात गुरुवारी सकाळपासून ढगाळ ...
निसर्गाचे चक्र बिघडल्याने द्राक्षबागांना मोठा फटका बसला असून, द्राक्ष उत्पादकांची चिंता वाढली आहे. निफाड तालुक्यात गुरुवारी सकाळपासून ढगाळ वातावरण तयार झाल्यानंतर सायंकाळी ओझर, पिंपळगाव, निफाड सुकेना, दीक्षी, उगाव, सायखेडा परिसरात पाऊस झाला. काढणीला आलेल्या द्राक्षबागांना सर्वाधिक फटका बसत आहे. अवघ्या काही दिवसांवर हार्वेस्टिंगसाठी असलेल्या बागायतदारांना आता हातातोंडाशी आलेला घास हिसकावून जातो की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ओझर आणि परिसरात अधिक द्राक्षबागा विस्तारल्या आहेत. जवळजवळ सर्वच बागांमध्ये यावर्षी द्राक्षांचा बहर उत्तम आहे. आतापर्यंत निफाड तालुक्यातील २५ ते ३० टक्के बागांमधील द्राक्षांचे हार्वेस्टिंग झाले आहे, तर उर्वरित ७५ टक्के बागांचे हार्वेस्टिंग होणे बाकी आहे. वातावरणातील बदलामुळे द्राक्षांवर भुरी रोगाचा प्रादुर्भाव वाढेल, अशी शक्यता आहे.