ओझरला वाहतूककोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 12:49 AM2017-08-22T00:49:47+5:302017-08-22T00:49:53+5:30

येथील अपूर्ण असलेल्या सहापदरी रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात कधी सुरुवात होणार, असा प्रश्न रहिवाशांना पडला असताना येथील सर्व्हिस रोडचा वापर बस आणि अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी सर्रासपणे सुरू असल्याचे चित्र आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

 Ozarla transporters | ओझरला वाहतूककोंडी

ओझरला वाहतूककोंडी

Next

ओझर : येथील अपूर्ण असलेल्या सहापदरी रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात कधी सुरुवात होणार, असा प्रश्न रहिवाशांना पडला असताना येथील सर्व्हिस रोडचा वापर बस आणि अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी सर्रासपणे सुरू असल्याचे चित्र आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. ओझर गाव शहराकडे वाटचाल करत असताना येथील वाढलेली वाहनांची संख्या बघता महामार्गाला लागून असलेला सर्व्हिस रोडदेखील अपूर्णावस्थेत आहे. मेनगेटपासून ते पवार आॅटोपर्यंत व मुख्य महामार्गाच्या पूलापासून ते रिलायंस पेट्रोलपंपापर्यंत सर्व्हिस रोड आहे, तर दुसºया बाजूने अनेक ठिकाणी हा सर्व्हिस रोड अपूर्ण अवस्थेत आहे. मूळ महामार्ग गाव परिसरात दुपदरी असून, त्यामुळे वाहतूक कोंडी नित्याचीच बनली आहे. यामुळे नागरिक व दुचाकी चालक वैतागले आहेत. एकीकडे स्थानिक रहिवाशांना ये-जा करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या सर्व्हिस रोडचा लांब पल्ल्याच्या एसटी बसेस व अवजड वाहने वापर करत असल्याने सतत छोटे-मोठे अपघात होत असतात. महामार्गाला लागून असलेल्या अनेक उपनगरांमध्ये राहत असलेल्या लोकसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यांना ये-जा करण्यासाठी असणारे छोटे रस्ते याच सर्व्हिस रोडला येऊन मिळतात. यात संजीवनी नगर, शिवाजी नगर, लोहिया नगर, साईधाम, रावसाहेब कॉलनी, पंडित कॉलनी, धामटनगर, सायखेडा फाटा, कृषी उत्पन्न बाजार समिती, खंडेराव महाराज मंदिर, यात्रा मैदान यांचा समावेश आहे. गाव परिसरात मुख्य महामार्ग दुपदरी असल्याने बसचालक वेळ वाचवण्यासाठी या सर्व्हिस रोडचा वापर करतात. त्यांच्या वाहनांना वेगही खूप असतो. पोलिसांनी अनेकवेळा या ठिकाणी बॅरिकेडिंग लावले; परंतु यालाही कोणीच जुमानत नाही. संबंधित प्रशासनाने वाहतूककोंडीची दखल घेणे गरजेचे आहे. महामार्गालगत शाळा-महाविद्यालय असल्याने रस्ता ओलांडताना विद्यार्थ्यांची तारांबळ उडत आहे. सततच्या होणाºया वाहतूक कोंडीवर संबंधित प्रशासाने उपाययोजना करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

Web Title:  Ozarla transporters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.