ओझर गावातील पूल बनले धोकादायक

By admin | Published: November 6, 2016 10:44 PM2016-11-06T22:44:15+5:302016-11-06T22:45:50+5:30

ओझर गावातील पूल बनले धोकादायक

Ozhar village becomes a dangerous bridge | ओझर गावातील पूल बनले धोकादायक

ओझर गावातील पूल बनले धोकादायक

Next

ओझर : येथील बाणगंगा नदीवरील लहान पूल निमुळते आणि कठड्याविना धोकादायक बनले आहेत. या पुलांवरून पायी चालणे तसेच वाहन चालविणेही धोक्याचे ठरले आहे. आताच्या झालेल्या पावसाळ्यात दोनदा बाणगंगा नदीला महापूर आला. यात कधी नव्हे इतकी वाढलेली पातळी ओझरकरांनी अनुभवली असली तरी गावात येतेवेळी एकूण तीन पुलांवरून यावे लागते. मारुती वेस जवळील पूल, जुना सायखेडारोड येथील शिंदे मळा, आमदार वस्ती, शेलार वस्ती, भडके वस्ती, रासकर मळा, पगार वस्तीला जाणारा पूल आणि नवीन इंग्रजी शाळेजवळील पादचारी पूल. दरवर्षी या तिन्ही पुलांना पुराचा फटका बसणे ही नित्याची बाब झाली आहे. यंदादेखील महापुरामुळे सदर पुलांचे कठडे वाहून गेले. कारण पाण्याच्या विसर्गाने पूल दिसेनासे झाले. सध्याही तिन्ही पूल अनाथ अवस्थेत असून, दररोज यावरून मोठी वर्दळ सुरू असते. नवीन इंग्रजी शाळेजवळील पादचारी पुलाजवळ भीमगर्जनानगर असून, त्याला लागूनच नवीन इंग्रजी शाळा आहे. समोरच्या बाजूला माधवराव बोरस्ते विद्यालय असून, दररोज येथून अनेक विद्यार्थी ये-जा करीत असतात. परंतु सदर पुलाला कठडे नसून पूल अधांतरी अवस्थेमध्ये आहे. पुलावरील रस्तादेखील पूर्णपणे उखडून गेला आहे. रात्रीच्या वेळेस या ठिकाणी नेहमी गडद अंधार असतो. येथे अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे. जुना सायखेडा रस्त्यावरील पूलदेखील याच अवस्थेमध्ये असून, अर्ध्याहून अधिक पुलाचे कठडे हे पूर्णपणे वाकलेल्या अवस्थेमध्ये आहे. या पुलाचा वापर हा वाहन आणि पायी दोन्हीसाठी मोठ्या प्रमाणावर होत असून, सामान्य नागरिकांबरोबर शेतकरी, शेतमजूर, आबालवृद्ध आपल्या शेतमालाची ने-आण येथून करतात. ओझरच्या अनेक दिग्गजांनादेखील हा पूल ओलांडूनच गावात यावे लागते. अनेक लहान मुलेदेखील शाळेत या पुलावरून जातात. परंतु पूर येऊन तीन महिन्यांच्या वर काळ लोटला तरी कठडे मात्र ‘जैसे थे’च आहेत.

Web Title: Ozhar village becomes a dangerous bridge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.