ओझरची ग्रामसभा ठरली वादळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 03:53 PM2018-08-17T15:53:39+5:302018-08-17T15:54:03+5:30

ओझर- निफाड तालुक्यातील सर्वात मोठी असलेल्या ओझर ग्रामपालिकेत स्वातंत्र्य दिना निमित्त झालेल्या ग्रामसभेत वीज वितरण कंपनीच्या कारभार आणि गौणखनिजाच्या मुरूमा वरून आरोप प्रत्यारोप होत अभुतपूर्व गोंधळ झाला.

 Ozhar's Gram Sabha was a storm | ओझरची ग्रामसभा ठरली वादळी

ओझरची ग्रामसभा ठरली वादळी

Next
ठळक मुद्देअध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य यतीन कदम होते.यावेळी व्यासपीठावर माजी आमदार मंदाकिनी कदम, चैताली बोरस्ते सरपंच जान्हवी कदम,उपसरपंच सागर शेजवळ, नितीन पवार,नितीन जाधव,प्रकाश महाले,संजय पगार आदी उपस्थित होते.


ओझर- निफाड तालुक्यातील सर्वात मोठी असलेल्या ओझर ग्रामपालिकेत स्वातंत्र्य दिना निमित्त झालेल्या ग्रामसभेत वीज वितरण कंपनीच्या कारभार आणि गौणखनिजाच्या मुरूमा वरून आरोप प्रत्यारोप होत अभुतपूर्व गोंधळ झाला. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य यतीन कदम होते.यावेळी व्यासपीठावर माजी आमदार मंदाकिनी कदम, चैताली बोरस्ते सरपंच जान्हवी कदम,उपसरपंच सागर शेजवळ, नितीन पवार,नितीन जाधव,प्रकाश महाले,संजय पगार आदी उपस्थित होते.
यासभेत विविध प्रकारच्या तक्रारी करण्यात आल्या. पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थी निवड करणे याविषयी दत्तात्रय देवकर यांनी माहिती दिली . खलील पटेल यांनी सांगितले की कबरस्थान मध्ये जाण्यासाठी रास्ता नाही लवकरात लवकर कार्यवाही करण्यात यावी . अभ्यासिका वाचनालय व मिलिंद मित्रमंडलाला जागा देण्याची मागणीरवींद्र जाधव यांनी केली . ज्या सभासदांना शासनाची कर्जमाफी मिळाली आहे त्यांना राष्ट्रीय कृत बँकेतून कर्ज प्रक्रि या करण्यास सहकार्य करण्याचे आवाहन नामदेव गुरु ळे यांनी केले व जिल्हा बँकेचे कर्ज भरून सहकार्य करावे असे सांगितले. विजवितरण कंपनी च्या संदर्भात सर्व ग्रामस्थांनी उग्र प्रतिक्रि या दिल्या. यात भास्कर शिंदे यांनी रिडींग घेणे,वीज पुरवठा खंडित, नवीन मीटर मुळे बिल जास्त,असा अंदाधुंदी कारभार सुरू असून ठोस उपाययोजना करण्याची मागणी करीत निषेध नोंदविला. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी देखील विज वितरण कंपनीच्या कारभारा विरोधात आक्र मक होत आपला राग व्यक्त केला. यावेळी यतिन कदम यांनी लवकरच विज वितरण कंपनीच्या वरीष्ठ अधिका-यांसोबत ग्रामस्थांची बैठक घेण्याची ग्वाही दिली. यात्रा मैदानात कोणत्याही प्रकारची गाळे व टपऱ्यांचे अतिक्रमण होऊ नये असा ठराव करण्यात यावा असे सुरेश कदम,सुखदेव चौरे यांनी सांगितले.यावेळी या आशयाचा ठराव बहुमताने पारित करण्यात आला. जि प शाळा आग्ररोड चे अनेक वर्षांपासून काम प्रलंबित असून ११वर्ग खोल्या साठी ४४ लाख निधी एप्रिल २०१७ला मंजूर झाला असून २महिन्यापूर्वी शाळेच्या खात्यात जमा आहे व याचे अधिकार मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समिती ला देण्यात यावे अशी माहिती पांडुरंग अहेर यांनी दिली. सर्व्हिस रोडवरील अपघात टाळण्यासाठी पांढरे पट्टे टाकावे व तलाठी कार्यालय दुसरीकडे नेण्यात यावे अशी मागणी वसंत गवळी यांनी केली. रतनलाल भट्टड यांनी सांगितले की स्मशानभूमी देखभाल करणेसाठी कर्मचारी नियुक्त करण्यात यावा. ग्रा प सदस्य संजय पगार यांनी रस्ता दुरूस्तीची मागणी केली. या प्रश्नी आमदार अनिल कदम समर्थक व यतिन कदम यांच्यात किरकोळ बाचाबाची झाली. यासभेप्रसंगी सुनील कदम,उमेश देशमुख,विक्र म सोनवणे,सतीश पगार,नितीन नाडेकर, मधुकर गवारे,धर्मेंद्र जाधव, आयुब अत्तर,दिनकर कदम,प्रशांत पगार,आशिष शिंदे,अन्सार कुरेशी, दिलीप चाफळकर,रतन काका भट्टड,विट्ठल करपे,भाऊसाहेब कदम,भारत पगार,गोपीनाथ वाघमारे, दीपक जाधव, रामू पाटील भैय्या शिंदे आदी उपस्थित होते.

Web Title:  Ozhar's Gram Sabha was a storm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.