पारदर्शकतेचा केवळ खेळ, जर्मा-खर्चाचा नाही ताळमेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 04:59 PM2017-07-27T16:59:31+5:302017-07-27T16:59:46+5:30

paaradarasakataecaa-kaevala-khaela-jaramaa-kharacaacaa-naahai-taalamaela | पारदर्शकतेचा केवळ खेळ, जर्मा-खर्चाचा नाही ताळमेळ

पारदर्शकतेचा केवळ खेळ, जर्मा-खर्चाचा नाही ताळमेळ

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : सभापतिपदाचा पदभार स्वीकारल्याबरोबर बाजार समितीत पारदर्शक व स्वच्छ कारभार सुरू होण्याची ग्वाही देणाºया शिवाजी चुंभळे यांच्यासमोर गेल्या दहा महिन्यांतील बाजार समितीच्या जमा-खर्चाचा ताळमेळ शोधण्याचे आव्हान उभे राहिले आहे. बारा संचालकांनी जमा-खर्चाची माहिती मिळण्यासाठी सचिवांना पत्र देऊन दहा महिन्यांचा काळ उलटला तरी अद्याप माहिती मिळालेली नाही.
गेल्या दहा महिन्यांच्या कार्यकाळात बाजार समितीच्या एकूण उत्पन्नात ४ कोटी ७५ लाखांची घट झाल्याचा दावा काही संचालकांनी केला आहे. त्यामुळे बारा संचालकांनी केलेल्या जमा-खर्चाच्या ताळमेळच्या आढाव्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. बाजार समितीच्या बरखास्तीच्या कार्यवाहीवर टांगती तलवार कायम असल्याने नवीन सभापती व उपसभापतींचा कार्यकाळ औट घटकेचा ठरण्याची चिन्हे आहेत. शिवाय भाजपावासी झालेल्या संचालकांनी सभापती पद हे एकेक वर्षाचे असल्याने बाजार समितीच्या कारभारात सारेच काही अलबेल आहे, असे नाही. बाजार समिती अधिनियम कायद्यानुसार बाजार समितीच्या जमा खर्चास दर दोन महिन्यांनी संचालक मंडळाच्या बैठकीत मंजुरी घेणे बंधनकारक असताना दहा दहा महिने जमा-खर्चाचा ताळमेळ सादर नसल्याने नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आर्थिक अनियमिततेबाबत आणखी एक प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Web Title: paaradarasakataecaa-kaevala-khaela-jaramaa-kharacaacaa-naahai-taalamaela

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.