संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर सुगडे बनविण्याला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 01:12 AM2021-01-04T01:12:25+5:302021-01-04T01:13:38+5:30

प्राचीन काळापासून चालत आलेला कुंभार व्यवसाय बदलत्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगातही आपले अस्तित्व टिकवून आहे. यंदा  १४ जानेवारीला येणाऱ्या संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर  गावोगावी सुगडे  करण्यात कारागीर व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. 

The pace of making sugade on the backdrop of Sankranti | संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर सुगडे बनविण्याला वेग

संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर सुगडे बनविण्याला वेग

googlenewsNext
ठळक मुद्देसंक्रांतीला वाण देण्यासाठी महत्त्व

चांदोरी : प्राचीन काळापासून चालत आलेला कुंभार व्यवसाय बदलत्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगातही आपले अस्तित्व टिकवून आहे. यंदा  १४ जानेवारीला येणाऱ्या संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर  गावोगावी सुगडे  करण्यात कारागीर व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. 
निफाड तालुक्यातील कुंभार समाज  जुन्या पद्धतीनेच चाकाचा वापर करून सुगडे(बोळके) तयार करत आहे.  मागील महिन्याभरापासून चांदोरी सह  परिसरातील  पिंपळस, चाटोरी, चितेगाव, सायखेडा  व  गोदाकाठ परिसरात व तालुक्यातील इतर गावांमध्ये सध्या कुंभार समाज  बांधव सुगडे बनविण्यात व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. संक्रांतीच्या दिवशी महिलांना  वाण  देण्यासाठी सुगड्यांचे विशेष धार्मिक महत्त्व आहे. बाजारात अनेक रेडीमेड प्लास्टीकचे सुगडे विक्रीसाठी उपलब्ध होत आहेत. 

Web Title: The pace of making sugade on the backdrop of Sankranti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.