पसारा बोगनवेलीचा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 12:29 AM2017-10-31T00:29:53+5:302017-10-31T00:30:00+5:30

‘हरित नाशिक-स्वच्छ नाशिक’ हे ब्रीद मिरविणाºया महापालिका प्रशासनाने शहरातील विविध रस्त्यांवरील खड्ड्यांपासून तर पदपथांपर्यंत सर्वच बाबींकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र पहावयास मिळते. कुठे प्रमाणापेक्षा अधिक वाढलेल्या बोगनवेलीचा पसारा तर कुठे कापलेल्या बोगनवेलीचा पदपथांवर टाकलेला कचरा असे चित्र पहावयास मिळत आहे.

Pacea Bougainvillea's ... | पसारा बोगनवेलीचा...

पसारा बोगनवेलीचा...

Next

नाशिक : ‘हरित नाशिक-स्वच्छ नाशिक’ हे ब्रीद मिरविणाºया महापालिका प्रशासनाने शहरातील विविध रस्त्यांवरील खड्ड्यांपासून तर पदपथांपर्यंत सर्वच बाबींकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र पहावयास मिळते. कुठे प्रमाणापेक्षा अधिक वाढलेल्या बोगनवेलीचा पसारा तर कुठे कापलेल्या बोगनवेलीचा पदपथांवर टाकलेला कचरा असे चित्र पहावयास मिळत आहे.  शहरातील पर्यटकांची वर्दळ असलेल्या पंचवटी-तपोवन परिसराला जोडणाºया मुख्य शाही मार्गाची महापालिकेच्या दुर्लक्षामुळे दुरवस्था झाली असून, या रस्त्याला ‘शाही’ बकालपणा आल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. आमदारांच्या मतदारसंघातील हा शाही मार्ग ‘शाही स्वच्छता’ अभियानाच्या प्रतीक्षेत आहे. गौरी पटांगण ते पंचवटी अमरधामपर्यंत शाही मार्गावरील दुभाजकांमध्ये अस्ताव्यस्त वाढलेल्या बोगनवेलीचा पसारा बघून पर्यटकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.  रस्त्याच्या दुतर्फा पदपथांवर असलेली अस्वच्छता, डेब्रीज व घाणीच्या साम्राज्यामुळे या मार्गावरून मार्गस्थ होताना पर्यटकांना नाकातोंडाला रुमाल लावावा लागतो. गोदाकाठालगतच्या या शाही मार्गासाठी विकासाचे ‘शाही मॉडेल’ राबविण्याची गरज आहे.  या मार्गावर स्वच्छता करून मार्गाचे नूतनीकरण करत धार्मिक पर्यटनस्थळांची माहिती दर्शविणारे फलक उभारण्याची गरज आहे. तसेच दुभाजकांची आकर्षक बांधणी करून रंगरंगोटी केल्यास पर्यटकांमध्ये चांगला संदेश जाण्यास मदत होईल. 
फांद्या छाटाव्यात 
मुंबई नाक्यावरील महामार्गापासून चांडक सर्कलकडे जाणाºया अहल्यादेवी होळकर मार्गावरील दुभाजकांमधील बोगनवेलीचा वाढलेला पसारा कमी करण्यासाठी छाटणी करण्यात आली; मात्र नंतर वेलीच्या फांद्या रस्त्याच्या पदपथावर टाकण्यात आल्याने त्यांचा पसारा कायम असून, त्यामुळे रस्त्याच्या विद्रूपीकरणात भर पडली आहे. रस्त्यावरील फांद्या उचलून स्वच्छता करण्याची मागणी होत आहे.

Web Title: Pacea Bougainvillea's ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.