वसंत पंचमीनिमित्त पालखी मिरवणूक
By admin | Published: February 2, 2017 11:11 PM2017-02-02T23:11:41+5:302017-02-02T23:12:00+5:30
येवला : देवांग कोष्टी समाजातर्फे विविध कार्यक्रम
येवला : येवला शाहरातील देवांग कोष्टी समाजाच्या वतीने बुधवारी माघ पंचमी अर्थात वसंत पंचमी उत्सव निमित्ति सवाद्य सनईचौघडा, उंट, भालदार चोपदार, पालखीसह उत्साहात मिरवणूक काढण्यात आली. माघ महिन्यामधील वसंत पंचमी हा सरस्वतीच्या उपासनेचा दिवस आहे अशी मान्यता आहे. पंचमीला सरस्वतीचा उत्सव मोठ्या आनंदाने व जोशाने राज्यभर सादर करण्याची परंपरा आहे. याचाच एक भाग म्हणून येथील माता श्रीचौण्डेश्वरी मूर्तीचा पुन:प्राणप्रतिष्ठा चतुर्थ वर्धापनदिन व वसंत पंचमीचा महोत्सवादरम्यान मंदिर गाभाऱ्यासह परिसरात रोषणाई करण्यात आली.
प्रारंभी सोहळ्याचे प्रमुख अतिथी कोष्टी समाजाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री व सौ. चोल राजेश्वर (हैदराबाद), अनिल बाबर, संजय लोकरे, प्रकाश साकरे, सुरेश असलेकर, दत्तात्रय चेचकर, विजय कलढोणे, पंकज पन्हाळे यांनी सपत्नीक अभिषेक केला आणि पालखी मिरवणुकीला सुरु वात झाली.
पालखी उत्सवात यंदा श्रीसाईबाबा यांचा महिमेचा जिवंत देखावा करण्यात आला होता. पालखीचा मान महिलांना देण्यात आला होता. विशेष म्हणजे फेटा घालून महिलांनी पालखी शहर मुख्य मार्गक्रमण केले. मोठा उत्साह तरुणांमध्ये दिसून आला. शहरात पहाडगल्लीत टक्कर गणेश मित्रमंडळ, मेनरोड येथे महेश काबरा पतसंस्था, शिंपी समाज साळी समाज अशा विविध ठिकाणी सडा रांगोळीने स्वागत करण्यात आले. श्रीसाईबाबा यांच्या महिम्याच्या जिवंत देखाव्यात साईबाबांच्या भूमिकेत प्रमोद अवणकर होते. महिलांनी नऊवारी साडी परिधान करून, तर पुरुषांनी भगवी टोपी परिधान केली होती. उत्सवाध्ये देवांग कोष्टी समाजाच्या महिला, युवती तसेच बालके, तरुण वृद्ध लोक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पहाटे श्रीचौंडेश्वरी मातेचा अभिषेक, आरती व मातेचा दुग्धाभिषेक व पुजन करून मातेची सवाद्य पालखी मिरवणूक निघाली. पालखीचा मधली गल्ली येथील मंदिरात समारोप करण्यात आला. दरम्यान, अनेक मान्यवरांची यात उपस्थिती होती. कार्यक्रमात कन्यारत्नांना साडी चोळी आणि विविध क्षेत्रांतील समाजातील गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विश्वस्त मनोज भागवत, आभार संदीप
बाबर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी समाजाचे सर्व तरुण मंडळ आणि महिला मंडळांनी सहभाग घेतला. (वार्ताहर)