जोरदार अतिवृष्टीमुळे भातपीक पाण्याखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2020 11:00 PM2020-10-23T23:00:02+5:302020-10-24T02:50:25+5:30
इगतपुरी तालुक्यात अतिवृष्टीने नुकसान झाले असून, कवडदरा, घोटी खुर्द येथे सहाय्यक कृषी अधिकारी राऊतसह सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांनी नुकसान झालेल्या भातपिकांची पाहणी केली. सध्या भात सोंगणी हंगाम सुरू झाला आहे.
कवडदरा : इगतपुरी तालुक्यात अतिवृष्टीने नुकसान झाले असून, कवडदरा, घोटी खुर्द येथे सहाय्यक कृषी अधिकारी राऊतसह सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांनी नुकसान झालेल्या भातपिकांची पाहणी केली. सध्या भात सोंगणी हंगाम सुरू झाला आहे.
दसरा, दिवाळी सण तोंडावर आला असून, करपा, मावा, तुडतुडे, टाका आदी रोगांमुळे आधीच नुकसान झालेल्या भातपिकाची ढगाळ हवामान व अधूनमधून बरसणाऱ्या अवकाळीमुळे भातपीक सोंगावे की नाही या विवंचनेत शेतकरी सापडला आहे. सोयाबीनदेखील काढणीला आले असून, काही शेतकऱ्यांनी शेतात सोंगून ठेवलेले भातपीक तसेच सोयाबीन पावसाने भिजले आहे, तर सोंगलेला भात सडण्याची स्थिती निर्माण झाली असून, हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या लहरीपणामुळे हिरावला जातो की काय या विचाराने शेतकरी धास्तावला आहे. या पार्श्वभूमीवर नुकसान झालेल्या पिकांचे सरसकट पंचनामे करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना भरपाई मिळावी तसेच विमा कंपन्यांनीही सरसकट पीकविमे मंजूर करावेत, अशी मागणी शेतकरी करत आहेत. यावेळी भाजप इगतपुरी तालुका उपाध्यक्ष रमेश निसरड, घोटी खु. सरपंच कैलास फोकणे, ग्रामपंचायत सदस्य रामभाऊ रोंगटे, भाऊराव रोंगटे, सावळीराम रोंगटे, विशाल भोईर, सुरेश
बर्डे, भास्कर रोंगटे, संतोष रोंगटे, बाळू रोंगटे, बाळासाहेब कलवर, सतीश फोकणे, चंद्रभान फोकणे, सुभाष फोकणे, तुकाराम शिंगोटे, शरद फोकणे, रुंजा फोकणे उपस्थित
होते.
राज्यात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे जोरदार अतिवृष्टी होत आहे. यामुळे आधीच रोगराईमुळे खराब झालेले शेतातील भात अतिवृष्टीमुळे पूर्णत; पाण्यात बुडाले, तर सोंगणीयोग्य असलेले भाताचे उभे पीक आडवे पडले असून, यात भातपिकाची नासाडी झाल्याने शेतकरी मात्र धास्तावले आहेत. पंचनामे करण्याचे आदेश दिले असले तरी कमी पाण्यावर येणारा हळा भात सोंगावा की पंचनामा होईपर्यंत वाट पहावी हाही प्रश्न उभा राहिला आहे. सरसकट पंचनामे करून भरपाई द्यावी.
- रमेश निसरड, नुकसानग्रस्त शेतकरी