दर नसल्याने डांगरे फेकली रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 03:30 PM2021-06-19T15:30:57+5:302021-06-19T15:31:07+5:30
मानोरी : येवला तालुक्यातील पिंपळगाव लेप येथील शेतकरी गिरीश धारस्कर यांनी आपल्या २० गुंठे शेतात केलेल्या डांगरे कवडीमोल दराअभावी फेकून दिली. यातून उत्पादन खर्च फिटने देखील दुरापास्त झाल्याने हतबल झालेल्या धारस्कर यांनी आपल्या ३० ते ४० क्विंटल माल फेकून दिला.
मानोरी : येवला तालुक्यातील पिंपळगाव लेप येथील शेतकरी गिरीश धारस्कर यांनी आपल्या २० गुंठे शेतात केलेल्या डांगरे कवडीमोल दराअभावी फेकून दिली. यातून उत्पादन खर्च फिटने देखील दुरापास्त झाल्याने हतबल झालेल्या धारस्कर यांनी आपल्या ३० ते ४० क्विंटल माल फेकून दिला.
गिरीश धारस्कर यांनी फेब्रुवारी महिन्यात २० गुंठे शेतात पाण्याचे योग्य व्यवस्थापन करत मोठ्या कष्टाने डांगरांची लागवड केली होती. डांगरांतुन यंदा चांगले उत्पादन मिळेल अशी आशा धारस्कर यांना होती. लागवड दर्जेदार होत असल्याचे बघून त्यांनी २० गुंठ्याच्या लागवडीसाठी सुमारे ४० हजार रुपयांपर्यंत खर्च केला होता.
मार्च महिन्यात डांगराचे उत्पादन सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर या डांगराना ३५ ते ४० रुपये प्रति किलोचाभाव मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र अचानक राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने लॉकडाऊन होताच ३५ रुपये प्रति किलो दराने विकले जाणारे डांगर केवळ ४ ते ५ रुपये प्रति किलो दराने विकले जाऊ लागले. एप्रिल आणि मे महिन्यात आठवडे बाजार बंद असल्याने भाजीपाला विकता येत नव्हता. धारस्कर यांनी सुमारे अडीच ते तीन महिने डांगरे साठवणूक करून सुरक्षित ठिकाणी ठेवले होते.मात्र दोन महिन्यांचा लॉकडाऊन नंतर जून महिन्यात देखील कवडीमोल भावमिळत असताना साठवून ठेवलेले डांगर खराब होऊ लागल्याने धारस्कर यांनी केलेल्या भाव वाढीच्या अपेक्षांच केवळ स्वप्न राहिले. अखेर हतबल होऊन खराब झालेले ५० क्विंटल पैकी सुमारे ३० ते ४० क्विंटल डांगर उक्कीरड्यावर टाकून देण्याशिवाय कोणताही पर्याय राहिला नसल्याची संतप्त प्रतिक्रिया गिरीश धारस्कर यांनी व्यक्त केली आहे.
-------------------------
मोठ्या अपेक्षेने मी डांगर लावले होते. डांगर चांगले यावे यासाठी ४० हजार रुपयांपर्यंत खर्च केला मात्र अचानक लॉकडाऊन झाल्याने डांगराला कवडीमोल भाव मिळाल्याने यातून साधा उत्पादन खर्च देखिल फिटला नाही.
---- गिरीश धारस्कर, शेतकरी , पिंपळगाव लेप.