पाडळी विद्यालयाचा विज्ञान प्रयोगशाळा आपल्या दारी उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2020 04:53 PM2020-09-18T16:53:42+5:302020-09-18T16:55:27+5:30
सिन्नर: तालुक्यातील पाडळी येथील पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयातील शिक्षकांनी मुख्याध्यापक एस. बी. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ओझोन वायू दिनाचे औचित्य साधून विज्ञान प्रयोगशाळा विद्यार्थ्यांच्या दारी हा उपक्रम राबविण्यात आला.
सिन्नर: तालुक्यातील पाडळी येथील पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयातील शिक्षकांनी मुख्याध्यापक एस. बी. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ओझोन वायू दिनाचे औचित्य साधून विज्ञान प्रयोगशाळा विद्यार्थ्यांच्या दारी हा उपक्रम राबविण्यात आला. जागतिक ओझोन दिनाचे औचित्य साधून शिक्षकांनी बोगीरवाडी येथे जाऊन विद्यार्थ्यांना ओझोन दिनाचे महत्व सांगितले. ओझोन वायू मानव प्राणी व इतर सजीव प्राणी यांच्यासाठी किती आवश्यक आहे त्यासाठी आपण प्रदूषण टाळले पाहिजे. जर प्रदूषण वाढत राहिले तर अवकाशातील ओझोनचा थर पातळ होईल व त्याला भगदाड पडेल मानवी जीवास सूर्यापासून येणारे अतिनील किरणांचा सामना करावा लागेल म्हणून हा ओझोन वायू आपल्यासाठी किती आवश्यक आहे. त्यामळे जगाने प्रदूषण रोखण्यासाठी 16 सप्टेंबर हा जागतिक ओझोन वायू दिवस 1985 पासून साजरा करण्यात येत असल्याची माहिती विज्ञान शिक्षक बी.आर.चव्हाण यांनी दिली. बोगीर वाडी येथील विद्यार्थ्यांना काही प्रयोग करून दाखवण्यात आले. यावेळी टी. के. रेवगडे व सौ.सविता देशमुख यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.