संत निवृत्तीनाथांनी विसावा घेतलेल्या स्थळी पादुका मंदीर साकारणार : रामनाथ बोडके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 10:21 PM2021-02-09T22:21:31+5:302021-02-10T00:53:24+5:30

त्र्यंबकेश्वर : सातशे वर्षापुर्वी श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वरच्या पावन भुमीत प्रवेश करण्यापुर्वी तळवाडे शिवारातील तुपादेवी फाटा येथे संत निवृत्तीनाथांनी जेथे विश्रांती घेतली होती. त्या ठिकाणी आजही त्यांच्या पादुका आहेत. त्या ठिकाणी भारतीय वारकरी महासंघाचे तालुका अध्यक्ष शिवाजी कसबे यांनी पादुका मंदीर उभारण्याचा संकल्प संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या संजीवन समाधी यात्रेच्या पार्श्वभूमीवर केला आहे. यानिमित्ताने संत निवृत्तीनाथ महाराज पादुका न्यासची स्थापना करण्यात आली असुन पादुका मंदीर न्यासचे संस्थापकअध्यक्ष रामनाथ पाटील बोडके यांनी हे पादुका मंदीर साकारणार असुन या ठिकाणचा कायापालट लवकरच होणार असल्याचे सांगितले.

Paduka temple to be built at the place where Saint Nivruttinath rested: Ramnath Bodke | संत निवृत्तीनाथांनी विसावा घेतलेल्या स्थळी पादुका मंदीर साकारणार : रामनाथ बोडके

संत निवृत्तीनाथांनी विसावा घेतलेल्या स्थळी पादुका मंदीर साकारणार : रामनाथ बोडके

Next
ठळक मुद्देसंत निवृत्तीनाथ महाराज यांनी एक दिवस मुक्काम केला होता म्हणुन या ठिकाणी पादुका उभारल्या आहेत.

त्र्यंबकेश्वर : सातशे वर्षापुर्वी श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वरच्या पावन भुमीत प्रवेश करण्यापुर्वी तळवाडे शिवारातील तुपादेवी फाटा येथे संत निवृत्तीनाथांनी जेथे विश्रांती घेतली होती. त्या ठिकाणी आजही त्यांच्या पादुका आहेत. त्या ठिकाणी भारतीय वारकरी महासंघाचे तालुका अध्यक्ष शिवाजी कसबे यांनी पादुका मंदीर उभारण्याचा संकल्प संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या संजीवन समाधी यात्रेच्या पार्श्वभूमीवर केला आहे. यानिमित्ताने संत निवृत्तीनाथ महाराज पादुका न्यासची स्थापना करण्यात आली असुन पादुका मंदीर न्यासचे संस्थापकअध्यक्ष रामनाथ पाटील बोडके यांनी हे पादुका मंदीर साकारणार असुन या ठिकाणचा कायापालट लवकरच होणार असल्याचे सांगितले.

संत निवृत्तीनाथ महाराज यांची व कुटुंबियांची ब्रम्हगिरी प्रदक्षिणा करतांना विधिलिखितानुसार ताटातूट झाल्यानंतर निवृत्तीनाथ वगळता अन्य सारे कुटुंब नेवासा येथे स्वगृही परतले. पण निवृत्तीनाथ महाराज मात्र गंगाद्वारच्या गुरु गहिनीनाथांच्या गुहेत गुरु गहिनीनाथांचा अनुग्रह घेउन गुरु गहिनीनाथांची सेवा करत होते. ही सेवा पुर्ण झाल्यानंतर निवृत्तीनाथ पुनश्च आपल्या कुटुंबियांकडे गावी परतले. तेथे गेल्यावर त्यांना कळाले की आपले आईवडील गेले. हे चार भावंडे वडिलांनी केलेल्या कथित पापाचे प्रायश्चित्त त्यांच्या आईवडिलांनी तर घेतलेच पण या चार बाळांना शुध्दीपत्र मिळविण्यासाठी पैठण आदी ठिकाणी गेले, पण शुध्दीपत्र मिळाले नाही. पण या दिव्य भावंडांनी असे काही चमत्कार केले की पुढे त्यांना शुध्दीपत्राचीही गरज भासली नाही. निवृत्तीनाथ महाराज हेच ज्ञानदेवाचे गुरु होत. त्यांनी ज्ञानदेवास श्रीमद‌् भगवतगीता सरळ सोप्या भाषेत ज्ञानेश्वरी म्हणून सांगण्याची आज्ञा केली. पुढे ज्ञानेश्वरांनी गुरुआज्ञेने ज्ञानेश्वरी लिहीली. स्वतः भागवत धर्माची मुहूर्तमेढ रोवली. वारकरी सांप्रदायाची स्थापना केली. नाथ सांप्रदाय वारक-यांना सांगितला. शेवटी त्यांना वाटले आपले अवतार कार्य संपले आहे, असे वाटुन ते त्र्यंबकेश्वर येथे आपल्या गुरूस्थानी पायथ्याशी संजीवन समाधी घेण्यासाठी परत त्र्यंबकेश्वर येथे येत असतांना अतिशय थकवा वाटल्याने त्यांनी एक दिवस त्र्यंबकेश्वरच्या सिमेवर तळवाडे शिवारात मुक्काम केला.
दुस-या दिवशी ब्रम्हगिरी गंगाद्वारच्या पायथ्याशी संजीवन समाधी घेउन ते समाधिस्त झाले.

त्यांनी आदल्या दिवशी विश्रांती घेतलेली हीच ती जागा होय ! येथे अहिल्याबाई होळकर यांनी आपल्या कार्यकाळात संत निवृत्तीनाथ महाराज यांनी एक दिवस मुक्काम केला होता म्हणुन या ठिकाणी पादुका उभारल्या आहेत. त्या आजही आहेत. आता या पादुकांचे संरक्षण उन-पावसापासुन व्हावे म्हणून येथे पादुका मंदीर साकारणार आहे. दरम्यान यापुढे त्र्यंबकेश्वर येथे निवृत्तीनाथ यात्रेसाठी येणा-या पायी दिंड्या पहिल्य पासुन काही वेळ विसावतात. आणि यापुढेही येथे विसावतील अशा पध्दतीने येथे सोयी सुविधा उपलब्ध करण्यात येणार असल्याची माहिती रामनाथ बोडके यांनी दिली.

दरम्यान शिवाजी कसबे, रामनाथ पाटील बोडके, पुरुषोत्तम लोहगावकर, सागर उजे, स्वप्निल शेलार, भुषण अडसरे, रविंद्र सोनवणे आदींनी भुमिपुजन व पादुका पूजन केले.
या कार्यक्रम प्रसंगी विलास जगताप, पिंटु बोडके, माजी उपसरपंच रोहिदास बोडके, उपसरपंच संतोष बोडके, तानाजी कड, वामन बोडके, कोंडाजी आहेर, काशिनाथ बोडके, भाऊसाहेब बोडके, रामदास बोडके, बाळु बोडके आदी उपस्थित होते. (पादूकांचा फोटो मागवून बातमी घ्यावा)

Web Title: Paduka temple to be built at the place where Saint Nivruttinath rested: Ramnath Bodke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.