पारंपरिक लोककलेतून प्रबोधनाचा जागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 12:39 AM2018-12-17T00:39:59+5:302018-12-17T00:40:19+5:30

पुराणकथांमधून प्रबोधन अन पहाडी आवाज...टाळ, संबळ, ढोलकी यांसारख्या पारंपारिक लोकवाद्यांची साथ अन् भारूड, गोंधळासारख्या लोककलेचा माध्यमातून जागर करत मुंबईचे प्रसिध्द लोककलावंत डॉ. गणेश चंदनशिवे यांनी उपस्थित श्रोत्यांच्या मनाला मोहिनी घातली.

Pagodhana jagar from traditional folklore | पारंपरिक लोककलेतून प्रबोधनाचा जागर

पारंपरिक लोककलेतून प्रबोधनाचा जागर

Next
ठळक मुद्देचंदनशिवे यांनी उलगडला लोककलेचा प्रवास

नाशिक : पुराणकथांमधून प्रबोधन अन पहाडी आवाज...टाळ, संबळ, ढोलकी यांसारख्या पारंपारिक लोकवाद्यांची साथ अन् भारूड, गोंधळासारख्या लोककलेचा माध्यमातून जागर करत मुंबईचे प्रसिध्द लोककलावंत डॉ. गणेश चंदनशिवे यांनी उपस्थित श्रोत्यांच्या मनाला मोहिनी घातली.
सार्वजनिक वाचनालयाच्या ग्रंथालय सप्ताहाचे तीसरे पुष्प रविवारी (दि.१६) चंदनशिवे यांनी लोककलेच्या सादरीकरणातून गुंफले. औरंगाबादकर सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात त्यांनी लोककलांचा बाज, इतिहास, सादरीकरणाची पद्धत अन् प्रवास उलगडला. अनेक पुराणकथ्लृांचे दृष्टांत सांगत भारु ड कसे सादर केले जाते, त्यात रु ढी-परंपरांबाबत लोकप्रबोधन कसे केले जाते, हे त्यांनी यावेळी पटवून दिले. दरम्यान, चांगल्या विचाराची कास धरल्यास उत्तरोत्तर प्रगती होते तर त्याउलट वाई विचारांची साथ घेतल्यास अधोगतीला निमंत्रण मिळते, असा संदेश त्यांनी एका कथेतून देण्याचा प्रयत्न केला.
देवीचा गोंधळ
संत तुकडोजी महाराजांचे ‘मनी नाही भाव, देवा मला पाव’ हा अभंग सादर करीत त्यांनी उपस्थित श्रोत्यांची दिलखूलास दाद मिळविली. सप्तशृंगगडावरील देवीची आख्यायिका सांगत चंदनशिवे यांनी गोंधळ ही संकल्पना मांडली. लोकांचा समूह म्हणजे ‘गणदल’ असा मूळ शब्द आहे. त्यापासून गोंधळ शब्द तयार झाला, असे सांगून त्यांनी अंबाबाईचा गोंधळ सादर केला. त्यांना प्रा. प्रवीण जाधव, अमति शिंदे, आकाश जाधव, प्रशांत जाधव, यशवंत जाधव, केतन तरे यांनी साथसंगत केली.

Web Title: Pagodhana jagar from traditional folklore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.