खालपफाटा शाळेत ‘पाहुणा आला फळा’ उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:10 AM2021-07-04T04:10:18+5:302021-07-04T04:10:18+5:30
लोहोणेर : - कोरोना महामारीमुळे गेल्या वर्षभरापासून शाळा बंद आहेत. विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी विविध शिक्षक वेगवेगळे ...
लोहोणेर : - कोरोना महामारीमुळे गेल्या वर्षभरापासून शाळा बंद आहेत. विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी विविध शिक्षक वेगवेगळे प्रयोग राबवीत आहेत. लोहोणेर शिवारातील खालपफाटा येथील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेस उपक्रमशील शिक्षिका वैशाली सूर्यवंशी यांच्या ‘पाहुणा आला फळा’ या उपक्रमाचे परिसरात कौतुक होत आहे.
सूर्यवंशी यांच्या एज्युकेशन ऑन व्हीलस या उपक्रमाचेही याप्रसंगी उद्घाटन करण्यात आले. शिक्षक ऑनलाइन शिक्षणासाठी निरनिराळे प्रयोग राबवीत असताना गरीब, आदिवासी, मजूर पालकांच्या मुलांना ऑनलाइन शिक्षणाची कुठलीच सुविधा उपलब्ध नाही. अशा मुलांचा शिक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी सूर्यवंशी यांनी वस्तीवरील फळे रंगवून प्रत्यक्ष तेथे जाऊन अध्यापनाचे काम गेले वर्षभर सुरू ठेवले. यावर्षीदेखील कोरोनाच्या साथीमुळे शाळा उघडल्या नाहीत. अशा वेळेस मुलांच्या शिक्षणातील उणीव भरून काढण्यासाठी सूर्यवंशी यांनी ‘एज्युकेशन ऑन व्हीलस’ हा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमात शाळेत उपलब्ध असलेले शैक्षणिक वातावरण प्रत्यक्ष वस्तीवर उपलब्ध करून देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शिवदास वाघ, मुख्याध्यापिका पुष्पा गुंजाळ, माजी सरपंच हिरामण वाघ आदी उपस्थित होते.
---------------------------
परिणामकारक अध्यापन
मोबाइल स्पीकर, हँडपपेटस् तसेच इतर शैक्षणिक साहित्याचा वापर करून मुलांचे अध्यापन अधिक परिणामकारक करीत शाळेतील वातावरण प्रत्यक्ष मुलांच्या अंगणात निर्माण होत आहे. चांगल्या आरोग्याच्या सवयी, कृतीयुक्त खेळ, स्पीकरचा वापर करून कविता व गाणे घेणे, इंग्रजी संभाषणासाठी हँडपपेट्सचा वापर करणे. अशा अनेक प्रयत्नांची प्रत्यक्ष गटशिक्षणाधिकारी सतीश बच्छाव, तसेच विस्ताराधिकारी किरण वसावे यांनी भेट देऊन पाहणी केली व उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. या उपक्रमात मुलांना स्वच्छतेच्या सवयी लावण्यासाठी नेलकटरचे वाटप करण्यात आले.
----------------------
लोहोणेर खालप फाटा येथील शाळेत ‘पाहुणा आला फळा’ उपक्रमाचे कौतुक करताना सतीश बच्छाव, किरण वसावे, शिवदास वाघ व वैशाली सूर्यवंशी. (०३ लाेहोणेर १)
030721\03nsk_3_03072021_13.jpg
०३ लोहोणेर १