गुडघेदुखीवर वेदनाशामक औषधे अत्यंत घातक

By admin | Published: December 28, 2015 12:25 AM2015-12-28T00:25:25+5:302015-12-28T00:25:51+5:30

हेमंत चौधरी : प्रौढ मित्रमंडळाच्या रौप्यमहोत्सवात प्रतिपादन

Painful medicines on knee joint are extremely lethal | गुडघेदुखीवर वेदनाशामक औषधे अत्यंत घातक

गुडघेदुखीवर वेदनाशामक औषधे अत्यंत घातक

Next

नाशिक : उतारवयामध्ये ज्येष्ठ नागरिकांना गुडघेदुखीचा त्रास जाणवू लागतो. गुडखेदुखीच्या असह्य वेदनांपासून सुटका होण्यासाठी ज्येष्ठांकडून वेदनाशामक गोळ्यांना प्राधान्य दिले जाते; मात्र हे शरीराच्या अन्य अवयवांच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे, असे प्रतिपादन सांधे जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन डॉ. हेमंत चौधरी यांनी केले.
डिसूझा कॉलनी येथील प्रौढ नागरिक मित्रमंडळाच्या रौप्यमहोत्सव सोहळ्यादरम्यान आयोजित व्याख्यानात डॉ. चौधरी प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, गुडघ्याचा आजार असणाऱ्या व्यक्तींनी आहारावर नियंत्रण ठेवून संतुलित आहार घ्यावा. बटाटा, साबुदाणा यांसारखे खाद्यपदार्थ आहारात घेऊ नये. संधिवातापासून सुरक्षित राहण्यासाठी दररोज सकाळी रिकाम्यापोटी आलं रस सेवन करावे, तसेच घाम येईपर्यंत चालण्याचा प्रयत्न करावा. बी-१२ जीवनसत्त्वाचा पुरवठा करणाऱ्या खाद्यपदार्थांचा आहारात अधिकाधिक समावेश के ल्यास गुडघेदुखीपासून निश्चित आराम मिळेल, असेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी दृकश्राव्य यंत्रणेद्वारे नवीन सांधेरोपण शस्त्रक्रियेविषयीची माहिती दिली. याप्रसंगी व्यासपीठावर आमदार देवयानी फरांदे, कार्याध्यक्ष रंजन शाह, अध्यक्ष अनंत साळी, उपाध्यक्ष डॉ. शरद पाटील, आर. पी. पुरी, चंद्रकांत जामदार, विजया पंडित, जितेंद्र येवले आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Painful medicines on knee joint are extremely lethal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.