गुळवंच योगी विद्यालयात चित्रकला प्रात्यक्षिक स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2019 11:14 PM2019-11-14T23:14:32+5:302019-11-14T23:16:14+5:30

गुळवंच : सिन्नर तालुक्यातील गुळवंच येथील श्रीमान योगी शिवछत्रपती शेतकरी विद्यालयामध्ये महाराष्ट्र शासनाच्या शासकीय रेखाकला ग्रेड चित्रकला परीक्षांच्या अनुषंगाने चित्रकला प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले होते.

Painting demonstration competition at Gulvanch Yogi School | गुळवंच योगी विद्यालयात चित्रकला प्रात्यक्षिक स्पर्धा

गुळवंच येथील एसएसएस विद्यालयात चित्रकला प्रात्यक्षिक कार्यक्रमात चित्रकार राहुल पगारे, कलाशिक्षक रवींद्र कांगणे आदींसह विद्यार्थी.

googlenewsNext
ठळक मुद्दे रंगकामाच्या विविध पद्धती प्रात्यक्षिकातून समजावून दिल्या.

लोकमत न्यूज नेटवर्क
गुळवंच : सिन्नर तालुक्यातील गुळवंच येथील श्रीमान योगी शिवछत्रपती शेतकरी विद्यालयामध्ये महाराष्ट्र शासनाच्या शासकीय रेखाकला ग्रेड चित्रकला परीक्षांच्या अनुषंगाने चित्रकला प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले होते.
चित्रकार राहुल पगारे यांनी विद्यार्थ्यांना विविध रेखाटने, स्मरणचित्रांच्या व रंगकामाच्या विविध पद्धती प्रात्यक्षिकातून समजावून दिल्या. कला ही साधनेतून अधिक जिवंत होत जाते आणि त्यासाठी सराव हेच एकमेव तंत्र आहे. अशा स्वरूपाचे अनमोल मार्गदर्शन त्यांनी विद्यार्थ्यांना दिले. विद्यार्थीही आपल्या रंगांच्या दुनियेत हरवून गेले. पगारे यांची चित्रे इयत्ता दुंसरीच्या पाठ्यापुस्तकांमध्ये समाविष्ट आहेत, तसेच अनेक ठिकाणी त्यांच्या चित्रांचे प्रदर्शनही भरले आहे. त्यांची चित्रे अनेक दिग्गजांनी विकत घेतली आहेत. कलाशिक्षक रवींद्र कांगणे यांनी प्रास्ताविक केले. 
यावेळी मुख्याध्यापक मधुकर काळे यांच्यासह शिक्षक, पालक व ग्रामस्थ उपस्थित होते. या स्पर्धांना परिसरातील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Web Title: Painting demonstration competition at Gulvanch Yogi School

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.