चित्रकार सावंत बंधुंनी चीनमध्ये फडकविला तिरंगा

By Admin | Published: December 22, 2014 01:10 AM2014-12-22T01:10:57+5:302014-12-22T01:11:11+5:30

दहा लाखांचे इनाम : आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात चीन सरकारकडून झाला गौरव, पोस्टकार्डवरही बहुमान

The painting by the Sawant brothers in China has been tricolor | चित्रकार सावंत बंधुंनी चीनमध्ये फडकविला तिरंगा

चित्रकार सावंत बंधुंनी चीनमध्ये फडकविला तिरंगा

googlenewsNext

नाशिक : आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या चित्रशैलीने गौरविलेले नाशिकचे चित्रकार राजेश आणि प्रफुल्ल सावंत या बंधुंनी चीनमध्ये चिन्ताव येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय चित्रप्रदर्शनातही भारताचा तिरंगा फडकविला असून, नाशिकच्या नावलौकिकात भर घातली आहे. सावंत बंधुंना प्रत्येकी पाच लाख रुपयांचे इनाम समारंभपूर्वक देण्यात आले याशिवाय चीन सरकारच्या पोस्टकार्डावरही सावंत बंधुंची चित्रे प्रदर्शित करत त्यांचा सन्मान केला आहे.
चीनमध्ये चिन्ताव याठिकाणी आंतराष्ट्रीय चित्रप्रदर्शन सुरू असून, प्रदर्शनात सहभागी झालेले नाशिकचे चित्रकार राजेश सावंत यांच्या ‘गोल्डन जर्नी’ या चित्रास चिन्ताव आर्ट म्युझियमचे चेअरमन गॉँग माओ यांच्या हस्ते, तर चित्रकार प्रफुल्ल सावंत यांच्या ‘नारोशंकर टेम्पल अ‍ॅट मॉर्निंग’ या जलरंगातील चित्राला म्युझियमचे संचालक झ्यू डो यांच्या हस्ते प्रत्येकी पाच लाख रुपये व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. सावंत बंधुंना या चित्रप्रदर्शनासाठी विशेष निमंत्रित करण्यात आले होते. सावंत बंधुंची चित्रे म्युझियममध्ये कायमस्वरूपी संशोधन व अभ्यासासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. याशिवाय चीन सरकारने सावंत बंधुंची चित्रे पोस्टकार्डावरही मुद्रित करून भारताचा बहुमान केला आहे. नाशिकचे ज्येष्ठ चित्रकार भि. रा. सावंत यांचे सुपुत्र असलेल्या राजेश व प्रफुल्ल सावंत यांना चायना सरकारकडून प्रथमच प्रतिष्ठेच्या पारितोषिकाने गौरविण्यात आले आहे. सदर चित्रप्रदर्शन चीनमध्ये २८ फेबु्रवारी २०१५ पर्यंत सुरू राहणार असून, जगातील सर्वोत्कृष्ट २० जलरंग चित्रकारांमध्ये सावंत बंधुंचा समावेश झाला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The painting by the Sawant brothers in China has been tricolor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.