भारतापेक्षा परदेशी नागरिकांना परवडतो पाकिस्तानचा कांदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:12 AM2021-07-20T04:12:20+5:302021-07-20T04:12:20+5:30
चौकट- पावसाचाही होतो कांदा दरावर परिणाम मागील चार पाच वर्षांचा आढावा घेतला तर साधारणपणे जुलैमध्ये कांदा दर वाढण्यास सुरुवात ...
चौकट-
पावसाचाही होतो कांदा दरावर परिणाम
मागील चार पाच वर्षांचा आढावा घेतला तर साधारणपणे जुलैमध्ये कांदा दर वाढण्यास सुरुवात होते. यावर्षी मात्र तसे झालेले नाही. अति पावसामुळे दक्षिण भारतात जर कांदा पिकाचे नुकसान झाले तर तिकडचा माल बाजारात येत नाही, यामुळे आपल्याकडील कांद्याला मागणी वाढते. यावर्षी तसे काहीही झालेले नाही. दक्षिण भारतातही पाऊस जेमतेम असल्याने तिकडचा कांदा बाजारात येऊ लागला आहे.
कोट-
नाशिक, नगर, पुणे या ठिकाणी जेवढा कांदा आहे तेवढाच कांदा सध्या परप्रांतातही आहे. तिकडचा कांदा आता बाजारात येऊ लागल्याने आपल्याकडील ग्राहक कमी झाले आहेत. याशिवाय बांगलादेशची मागणी कमी झाली आहे. पाकिस्तान आणि भारतीय कांद्याच्या दरात किमान शंभर डॉलरचा फरक पडत असल्यामुळे अखाती देशांमधून पाकिस्तानच्या कांद्याला पसंती दिली जात आहे. याचा निर्यातीवर परिणाम झाला आहे. श्रीलंका ही आपल्या कांद्याची मुख्य बाजारपेठ समजली जाते; पण त्या देशात मोठ्या प्रमाणात आर्थिक संकट निर्माण झाले आहे. या सर्वांमुळे दर घसरले आहेत.
- सतीश जैन, कांदा व्यापारी, सटाणा
कोट-
यावर्षी सुरुवातील कांद्याचे दर वाढले होते, त्यानंतर मागणी कमी झाल्याने आता दर उतरले आहेत. आज बाजारात येणारा माल दुय्यम प्रतीचा आहे. चांगल्या कांद्याला अजूनही चांगले दर मिळत आहेत. पाऊस कमी झाला आहे. याशिवाय परराज्यातील कांदा बाजारात येऊ लागला आहे. काही ठिकाणी यापूर्वीच कांद्याचा साठा करण्यात आला आहे. यामुळे मागणी कमी झाली असून, त्याचा दरांवर परिणाम झाला आहे. - दीपक गवळी, कांदा व्यापारी, पिंपळगाव बसवंत
कोट-
सध्या शेतकरी चाळीत साठवून ठेवलेला कांदा खाली-वर करत आहेत. जो माल खराब होण्याच्या मार्गावर आहे, असाच माल बाजारात येत आहे. हा माल निर्यातीला चालत नाही. देशांतर्गत बाजारपेठेतून येणारी मागणी कमी झाली आहे. चीन, इजिप्त आणि पाकिस्तान यांचे निर्यात धोरण आणि भारताचे निर्यात धोरण यात तफावत असल्याने तिकडचा कांदा आपल्यापेक्षा स्वस्त आहे. - नरेंद्र वाढवणे, सचिव, लासलगाव बाजार समिती