खामखेडा येथे दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ पाकिस्तानच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2019 18:45 IST2019-02-16T18:44:13+5:302019-02-16T18:45:24+5:30
खामखेडा : देवळा तालुक्यातील खामखेडा येथे चौफुलीवर दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ पाकिस्तानच्या प्रतिमेचे पुतळ्याचे दहन करण्यात आले.

खामखेडा येथील चौफुलीवर पाकिस्तान विरोधी घोषणा देते पाकिस्तानच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करतांना शिवसैनिक.
ठळक मुद्देचौफुलीवर पाकिस्तान विरोधी घोषणा
खामखेडा : देवळा तालुक्यातील खामखेडा येथे चौफुलीवर दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ पाकिस्तानच्या प्रतिमेचे पुतळ्याचे दहन करण्यात आले.
काश्मीर पुलवामा येथे दहशतवाध्यांनी केंद्रीय राखीव दलाच्या ताफ्यावर केलेल्या भ्याड हल्ल्याचा येथे तीव्र निषेध करण्यात येऊन खामखेडा येथील चौफुलीवर पाकिस्तान विरोधी घोषणा देते पाकिस्तानच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात येऊन श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. यावेळी शिवसेनेचे प्रशांत शेवाळे, काकाजी शेवाळे, जगन हिरे, डिंगबर हिरे आदी शिवसैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते.