डोंगरगाव विद्यालयात पालक सहविचार सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:10 AM2021-07-12T04:10:07+5:302021-07-12T04:10:07+5:30
यावेळी मुख्याध्यापक एस. के. सावंत यांनी ऑनलाइन क्लास, वार्षिक नियोजन याचबरोबर ऑनलाइन क्लासला विद्यार्थ्यांची अत्यल्प उपस्थिती, घरपोहोच ...
यावेळी मुख्याध्यापक एस. के. सावंत यांनी ऑनलाइन क्लास, वार्षिक नियोजन याचबरोबर ऑनलाइन क्लासला विद्यार्थ्यांची अत्यल्प उपस्थिती, घरपोहोच पाठ्यपुस्तके याविषयी चर्चा करण्यात आली. शिक्षण विभागाचा दि. ७ जुलैच्या अध्यादेशाचे वाचन सावंत यांनी केले. यावर पालकांनी काही मार्गदर्शक सूचना मांडल्या. पालकांना सेतू अभ्यास याविषयीची माहिती देण्यात आली. विद्यार्थी गुणवत्तेवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
याप्रसंगी सरपंच दयाराम सावंत, माजी उपसरपंच लालजी सावंत, एकनाथ केदारे, दादाजी गरूड, भीमराव अहिरे, छगन केदारे, राजेंद्र सावंत, किसन चव्हाण एन. के. आहेर, एम. एम. चाबूकस्वार, एस. जे. सावंत, डी. के. देवरे, डी. ए. ठाकरे आदींसह पालक उपस्थित होते.
फोटो - ११ मेशी १
डोंगरगाव विद्यालयात पालकांना मार्गदर्शन करताना मुख्याध्यापक एस.के.सावंत. समवेत सरपंच दयाराम सावंत व पालक.
110721\11nsk_3_11072021_13.jpg
डोंगरगाव विद्यालयात पालकांना मार्गदर्शन करताना मुख्याध्यापक एस.के.सावंत. समवेत सरपंच दयाराम सावंत व पालक.