लासलगाव येथे पालखी सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 12:29 AM2019-08-28T00:29:00+5:302019-08-28T00:33:33+5:30
लासलगाव : शहरात श्री संत सेना महाराज पुण्यतिथीनिमित्त मंगळवारी शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी शहरातील मुख्य मिरवणूक मार्गावरून पालखी काढण्यात आली. लाल रंगाची साडी परिधान करीत महिलांची विशेष उपस्थिती मिरवणूक सोहळ्यात होती.
लोकमत न्यूज नेटवर्क

येथील श्रीराम मंदिरात सकाळी श्री संत सेना महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन माजी सरपंच कुसुम होळकर यांच्या हस्ते झाल्यानंतर पालखी सोहळ्याला सुरुवात करण्यात आली. श्रीराम मंदिर, अहिल्यादेवी चौक, किल्ल्याच्या मागे, पाटील गल्ली, एमजी रोड, शिवाजी चौक, आंबेडकर रस्ता, बाजारपेठ यामार्गे पालखी सोहळा झाला. अनेक ठिकाणी महिलांनी पालखीचे स्वागत केले. समाजातील महिला व पुरुषांनी मिरवणुकीदरम्यान रिंगण सोहळा सादर करीत फुगडीचाही आनंद लुटला.
श्रीराम मंदिर येथे नांदूरमधमेश्वर येथील ह.भ.प. नामदेवशास्री महाराज अनारसे यांचे श्री संत सेना महाराज यांच्या जीवनावर प्रवचन झाले. यावेळी लासलगाव, पिंपळगाव नजीक, टाकळी विंचूर, ब्राह्मणगाव विंचूर, कोटमगाव, विंचूर व परिसरातील नागरिक उपस्थित होते.